Video : नाशिकची रुग्णसंख्या चौपटीने वाढली; जिल्हाधिकारी सुरज मांढरेंचा कानमंत्र...

Video : नाशिकची रुग्णसंख्या चौपटीने वाढली; जिल्हाधिकारी सुरज मांढरेंचा कानमंत्र...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नवीन वर्ष आले सोबत तिसरी लाटही घेऊन आले. पहिल्याच आठवड्यात करोनाच्या रुग्णसंख्येत चौपटीने वाढली आहे. अद्यापही सहा लाख नागरिकांचा दुसरा डोस घेतलेला नाही. वर्षाच्या सुरवातीला करोनाने थैमान घातल्यामुळे आता लसीकरण आणि स्वयंशिस्त हाच रामबाण उपाय या लाटेला थोपवू शकणार आहे असे मत जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी मांडले....

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक गतीने संसर्ग करत चालली आहे. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढते आहे, तर दुसरीकडे ओमायक्रोनसारख्या नव्या व्हायरसचेही (Omicron new variant) रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे कुणी दंड करेल, शिक्षा देईल या दृष्टीने नाही तर स्वयंस्फूर्तीने नियम पाळण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत.

स्वयंशिस्तिने ही लढाई आपल्याला प्रभावीपणे जिंकायची आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख नागरिकांचा दुसरया डोसची तारीख निघून गेली असूनही कुणी लस टोचून घेतलेली दिसत नाही.

लसीकरण (Vaccination) असेल तर करोना झाला तरी संभाव्य धोका टाळता येतो. लहान मुले, मोठी मानसं सर्वांनाच आता बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे करोनाची त्रिसूत्री पाळणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com