नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे करोना पाॅझिटिव्ह

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे करोना पाॅझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले सुरज मांढरे (Nashik Collector Suraj Mandhare) यांची करोना टेस्ट पाॅझिटिव्ह (Covid test Positive) आली आहे. दर आठवड्याला ते करोनाचाचणी करत असतात. या आठवड्याची चाचणी केल्यानंतर आज त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांना सौम्य लक्षणे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे....

या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief minister Ajit pawar) यांच्यासह बड्या नेत्यांनी नाशिकला दौरे केले. त्यांच्यासोबत ते उपस्थित होते. तसेच काल स्मार्ट सिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (State Chief Secretory Sitaram kunte) यांनी नाशिकला स्मार्ट सिटीची महत्वाची बैठक घेतली. त्यातही ते उपस्थित होते. (Nashik smart city meeting)

आठवड्याच्या सुरुवातील ते तीन दिवस पुणे येथे गेले होते. परत आल्यानंतर त्यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली होती. तसेच एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी रक्तदानदेखील केल्याचे समजते.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी करोनाचा पहिला रुग्ण नाशकात सापडल्यापासून आजतागायत चोख कामगिरी बजावली आहे. दुसऱ्या लाटेत नाशिक बिकट अवस्थेत गेले होते, तीदेखील परिस्थिती त्यांनी लिलया पेलली.

नियोजनपूर्वक कामकाज करून आज नाशिक, मालेगाव सह संपूर्ण जिल्ह्याची करोनापरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी मांढरे यांनी मोलाजी भूमिका बजावली आहे.

आज त्यांची करोना चाचणी बाधित आढळून आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल (दि ०२) दिवसभर काहीही त्रास नव्हता. रात्री घसा दुखू लागल्याने सकाळी टेस्ट करून घेतली. दुसरी लाट जवळपास ओसरली असताना व तिसऱ्या लाटेच्या तयारीला थोडा वेळ असताना या मधल्या टप्प्यात एकदा हा कोरोनाचा टिळा लागून जात आहे ही समाधानाची बाब आहे. पुढल्या आठवड्यात भेटूच.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com