नाशिक | प्रतिनिधी

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची करोना चाचणी बाधित आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच भुजबळ यांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करोनाच्या चाचणीसाठी स्वब दिले होते.

भुजबळ फार्म येथूनही कुटुंबियांसमवेत एकूण ६० जणांचे स्वब घेण्यात आले होते. यामध्ये काल रात्री उशीर चौघांची टेस्ट बाधित आढळली आहे. तर इतर व्यक्ती या निगेटिव्ह आढळून आल्याने सुटकेचा निश्वास अनेकांनी सोडला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील करोना चाचणीसाठी आपला स्वब दिला होता. या स्वबचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.