दसऱ्याला 'नासाका'चा बॉयलर पेटणार; २.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट - खासदार गोडसे

दसऱ्याला 'नासाका'चा बॉयलर पेटणार; २.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट - खासदार गोडसे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ गळीत हंगामाचा (Sugarcane Crushing Season) बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवार (दि. २४) रोजी सकाळी प.पु.१००८ महामंडालेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते व विविध मान्यवरांचे उपस्थित होणार आहे. यंदा २.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उदिष्ट ठेवलेले असून या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आणि खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी केले आहे...

नऊ वर्षांपासून बंद असलेला कारखाना गेल्यावर्षी मे.अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अॅण्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने चालविण्यासाठी घेतलेले आहे.चाचणी हंगाम व जुनी मशिनरी तसेच ऊस तोड कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे मागील वेळी ६८ हजार मे.टन गाळप करण्यात आले.या ऊसाला कारखान्याने एक रक्कमी रूपये २४०१/- प्रति मे.टन भाव दिला आहे. कारखाना सुरू झाल्याने चारशे बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असून सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यातील सतरा हजार शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे.

तसेच येत्या २०२३-२४ हंगामासाठी महामंडालेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या शुभहस्ते येत्या मंगळवारी बॉयलर पेटणार आहे. शेतकऱ्यांची ऊसतोडणी वेळेत व्हावी यासाठी सुमारे अडीच हजार तोडणी कर्मचारी असणार आहे. गळीत हंगाम सन २०२३-२०२४ साठी २.५० लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. कारखान्याच्या इतिहासात चालू गळीत हंगाम हा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने सर्व ऊस उत्पादकांनी (Sugarcane Growers) आपल्या ऊसाचा पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे.

दरम्यान, बॉयलर पेटविण्याच्या कार्यक्रमास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांच्यासह संचालक बी टी कडलग, शेरझाद पटेल, सागर गोडसे,नामदेव कडलग, श्रीमती रूकसिन पटेल, भाग्यश्री गोडसे, विलास आडके, जनरल मॅनेजर जे.सी.कुरणे आदींनी केले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com