लाख मोलाची रक्कम अवघ्या तासाभरात शोधली; वाचा सविस्तर

सरकारवाडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
लाख मोलाची रक्कम अवघ्या तासाभरात शोधली; वाचा सविस्तर

नाशिक । Nashik

कार्यालयीन रकमेचा बॅंकेत (Bank) भरणा करायला जात असतांना ती रक्कम खाली पडली असता सरकारवाडा पोलिसांनी तासाभरात शोधून तक्रारदाराच्या ताब्यात दिल्याने सरकारवाडा पोलिसांचे (Sarkarwada police) सर्वत्र कौतुक होत आहे...

याबाबत सविस्तर वृत्त असे की,सीए उल्हास बोरसे व सीए जयेश देसले यांचे ऑफिसमधील सहायक गणेशचंद्र पिंगळे यांना ऑफिसमधील जमा झालेली ६ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम (दि.९) दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव जनता सहकारी बँक (Jalgaon Janata Sahakari Bank) शाखा सी.बी. एस. नाशिक (CBS Nashik) येथे डिपॉजिट करण्यासाठी जात असतांना आधी ते रामायण बंगल्याचे (Ramayan Bungalow) समोर सीए तुषार पगार यांच्या ऑफिसमधून चेक घेण्यासाठी गेले. त्याठिकाणाहून परत येत असतांना त्यांनी बॅगेची चैन न लावता त्याठिकाणाहून दुचाकीवर (Two-wheeler) जात असतांना त्यांच्या रोख रकमेची लाल रंगाची पिशवी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी सदर बॅगेचा शोध घेतला असता त्यांना ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी थेट सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police Thane) गाठले व घडलेला प्रकार वपोनी साजन सोनवणे यांना सांगितला असता त्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे,अंमलदार संतोष लोंढे,रविंद्र लिलके, योगेश वायकंडे,रोहन कहाडळ,परबत,ससाणे यांना तपासासाठी रवाना केले.

दरम्यान, यावेळी पोलीस पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV ) तपासणी केली असता एक व्यक्ती सदर पैशाची पिशवी उचलत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सदर व्यक्तीची विचारणा केली असता त्याचे नाव अश्विनकुमार आगळे असल्याचे समजले. पोलिसांनी आगळे यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ६ लाख ६८ हजार रुपयांची रोकड पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी सदर रकमेचा शोध अवघ्या एक तासात घेऊन तक्रारदार पिंगळे यांच्या ताब्यात दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com