पोलीस वाहन मोजतेय अखेरच्या घटका

पोलीस वाहन मोजतेय अखेरच्या घटका

नवीन नाशिक | प्रतिनिधी

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांच्या वाहनाची दुरवस्था झाली असून सदैव तत्पर राहणाऱ्या पोलीसांना वेळेत पोहोचनेही कठीण झाले आहे...

सध्या पोलीस प्रशासनातर्फे नवीन नाशिकमध्ये विविध भागांमध्ये पोलिसांची गस्त पूर्वीच्या तुलनेने वाढली आहे. अशातच काही बेजबाबदार नागरिक अद्यापही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत.

अशा बेजबाबदार नागरिकांना पोलिस प्रशासनातर्फे लाठीचा प्रसाद देखील दिला जात आहे. मात्र तरीदेखील अद्याप त्यांच्यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.

तर पोलिस ठाण्यांमध्ये असलेले सर्व शासकीय वाहने हे सतत गस्तीवर असतात यामुळे शासकीय वाहनाची दुरवस्था झाली असून व खासगी गॅरेज अद्यापही बंद असल्याने किरकोळ स्वरूपात का होईना पोलीस वाहनांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com