गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांचा नवीन फंडा

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांचा नवीन फंडा

नाशिक । Nashik

पोलीस आयुक्त (Commissioner of Police) जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांच्या आदेशानुसार परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील सात पोलिस ठाण्याच्या (police station) अंतर्गत १८६ विविध प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या आहेत...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक पोलीस आयुक्तालय (Nashik Police Commissionerate) हद्दीतील कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राहण्याकरिता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naikanvare) यांच्या आदेशानुसार व परिमंडळ एक उपयुक्त अमोल तांबे (Amol Tambe) यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ एक हद्दीतील पंचवटी (Panchavati) आडगाव (Adgaon) म्हसरूळ (Mhasrul) भद्रकाली (Bhadrakali) सरकारवाडा (Sarkarwada) गंगापूर (Gangapur) व मुंबई नाका (Mumbai Naka) पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोज सहा ते सात पथके नेमून रात्री आठ ते अकरा व पहाटे एक ते चार वाजेपर्यंत पेट्रोलिंग, कोम्बिंग ऑपरेशन, टवाळखोर कारवाई, गुन्हेगारीचे चेकिंग, अत्याचार प्रतिबंधक कारवाई, पाहिजे असलेले संशयित आरोपी तपासणी, रेकॉर्डवरील संशयित आरोपी तपासणी, तडीपार आरोपी, तपासणी व इतर कारवाई संदर्भात दोन जून पासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेमध्ये प्रत्येक पोलिस ठाणे (Police station) निहाय स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली असून प्रत्येक पथकात एक पोलीस अधिकारी, पाच पुरुष पोलीस अंमलदार, दोन महिला पोलीस अंमलदार असे पथक नेमण्यात आले आहे.

ही मोहीम सहाय्यक आयुक्त विभाग १ गंगाधर सोनवणे (Gangadhar Sonawane) सहाय्यक आयुक्त २ दीपाली खन्ना (Deepali Khanna) यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील वपोनी पंचवटी डॉ. सिताराम कोल्हे, (Dr. Sitaram Kolhe) वपोनी आडगाव इरफान शेख, वपोनी म्हसरूळ अशोक साखरे, वपोनी भद्रकाली दत्तात्रय पवार,वपोनी सरकारवाडा साजन सोनवणे, वपोनी गंगापूर रियाज शेख, वपोनी मुंबईनाका पोलीस ठाणे सुनील रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत स्वतंत्र पथकातर्फे हि कारवाई सुरु राहणार असून आत्तापर्यंत १८६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com