पोलीस आयुक्तांच्या नियोजन व संकल्पनेमुळे गुन्हेगारीत घट

९ महिन्यांत ११ गुंडांवर ‘एमपीडीए’; १३०० सायबर दूत तर ७०० तरुण शांतता समिती सदस्य
पोलीस आयुक्तांच्या नियोजन व संकल्पनेमुळे गुन्हेगारीत घट

नाशिक | फारुक पठाण

नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आपला अनुभव व कौशल्य वापरुन नाशिक शहरातील गुन्हेगारी नियंत्रीत करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या नियोजन व संकल्पनेमुळे गुन्हेगारीत घट होत असल्याचे दिसत आहे. मागील ३ वर्षातील सर्वाधीक एमपीडीए कारवाई गत ९ महिन्यांमध्ये त्यांनी करुन तब्बल ११ गुंडांवर ‘एमपीडीए’ कायद्याचा वापर करुन त्यांना थेट तुरूगांत रवाना केले आहे.

त्याच प्रमाणे सायबर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी १ हजार ३०० सायबर दूतांची फौज तयार केली तर दुसरीकडे सुमारे ७०० तरुण-तरुणींना शांतता समितीत स्थान देऊन त्याचा वापर शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. अशा संकल्पनांमुळे नाशिकचे नावाची चर्चा होत आहे.

अंकुश शिंदे यांनी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतंत्र काही पथके तयार करुन गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी नियोजन केले आहे. त्यात गुंडा विरोधी पथकासह अमली पदार्थ विरोधी पथक, खंडणी, दरोडे व शस्त्र विरोधी पथकांची निर्मीती करण्यात आली आहे. त्याचा काम देखील चांगल्या पध्दतीने सुरू असून अनेक बेकायदा शस्त्र ठेवणार्‍यांचा ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले असून लाखो रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे नाशिक शहरात सामान्य नागरिकांची लुटमार करुन मारहाण व दहशत निर्माण करुन समाजात अशांतता निर्माण करणार्‍यांवर एमपीडीए कायद्यानूसार स्थानबध्दतेची कारवाई करण्यात येत आहे. कुताच दिलीप विष्णू गायकवाड (वय २५, रा. सिध्दार्थनगर, बॉईज टाऊन शाळेच्या समोर, नाशिक) या गुंडाला एमपीडीए कायद्यानुसार आयुक्त शिंदे यांनी त्याला थेट कारागृहात रवाना केले.

त्याने सिध्दार्थनगर, कॉलेजरोड, तिबेटीयन मार्केट, शरणपुर,नवीन नाशिकसह परिसरात दहशत कायम रहावी, यासाठी सर्वसामान्य नागरिकांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार व मारहाण करुन लोकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्याला १७ मे २०२२ रोजी नाशिक शहर व नाशिक ग्रामिण जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. गायकवाड याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याने गुन्हेगारी कृत्य सुरू ठेवून जनजिवन विस्कळीत केल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

शहरात शांतता प्रस्थापीक व्हावी, यासाठी विविध उपायोजना केल्या असून गत ९ महिन्यांमध्ये तब्बल ११ गुंडांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आबाधीत राहावी, त्यासाठी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची प्रतिबंधक कारवाई केल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे.

तसेच यापुर्वी गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करुन समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या गुंडांवर २०२१ मध्ये ९ तर २०२२ मध्ये २ गुंडांवर अशी कारवाई करण्यात आलेली आहे, मात्र चालू वर्षात आता पर्यंत ११ गुन्हेगारांवर कारवाई करुन पोलीस आयुक्तांनी गुंडांना चांगलाच दणका दिला आहे.

आपण चांगले काम करत राहायला पाहीजे शहराची शांतता अबाधिक रहावी, कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन काम करीत असतो. आम्ही आमचे कर्तव्य बजावत असून गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सर्वप्रकारे कायद्यांचा उपयोग करुन शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणार.

- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com