Video : ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर

नाशिक शहर काँग्रेसकडून निदर्शने
Video : ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर

नाशिक | Nashik

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आले.

नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने राजमहर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर व माजी मंत्री डॉ शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतांना सदरचे आरक्षण रद्द झाले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नसल्याचे शरद आहेर यांनी सांगितले.

छत्रपती शाहू महाराजांनी १२५ वर्षांपूर्वी शैक्षणिक व सामाजिक आरक्षण दिले होते, याच आधारावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला दिले होते. तत्कालीन भाजप चे देवेंद्र फडणवीस सरकारने हे आरक्षण घालवू छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला आहे. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो असे आहेर म्हणाले.

छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील मागास व दुर्लक्षित समाजाच्या प्रगतीसाठी व त्यांच्या उद्धारासाठी सर्वप्रथम आरक्षण देण्याचे काम केले आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा या उदात्त विचाराने सदरचे आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिले होते. तेच पुढे आत्तापर्यंत चालत आले होते. आरक्षण रद्द झाल्याचा निषेध शाहू खैरे यांनी व्यक्त केला.

डॉ शोभाताई बच्छाव व श्रीमती वात्सलताई खैरे यांनीही ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. व हे आरक्षण पुन्हा ओबीसी समाजाला मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ शोभाताई बच्छाव, नाशिक महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष व नगरसेविका वत्सलाताई खैरे, माजी नगरसेवक लक्षुमन धोत्रे, मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश (बबलू) खैरे, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, माजी नगरसेवक लक्षुमन जायभावे, ओरशांत बाविस्कर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनिफ बशीर, वसंत ठाकूर, ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल कोठुळे, दिनेश निकळे, कैलास कडलाग, अण्णा मोरे, अशोक थेटे, प्रकाश बदाडे, वामन खोसकर, वसंत जाधव, अंबापुरे, प्रमोद धोंडगे, प्रवीण काटे, संजय विभूते, जावेद पठाण, शब्बीर पठाण, देवानंद देशपांडे, राजकुमार जेफ, ज्ञानेश्वर जंत्रे, अनिल बोहोत, श्रीकांत शेरे, सुरज चव्हाण, भरती गीते, नागरगोजे, मोहिते, मोहित पिंगळे याच्यासहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com