नाशिक शहर बससेवेचे असे असेल भाडे; वनडे पाससह अनेक आकर्षक योजना

लहान मुले, विद्यार्थी, दिव्यांग आणि मदतनीसांसाठी मोठी सवलत
नाशिक शहर बससेवेचे असे असेल भाडे; वनडे पाससह अनेक आकर्षक योजना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिककरांना शहर बससेवेचे वेध लागले आहे. (Nashik city CNG buses) गेल्या दोन दिवसांपासून या बससेवेच्या चाचण्या (City bus Trial) सुरु होत्या. सुरुवातीला तांत्रिक ट्रायल (Technical Trial) पूर्ण झाल्यानतर प्रत्यक्ष प्रवाशांना घेऊन नाशिकच्या सीएनजी बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावू लागल्या आहेत. तपोवन (Tapovan) आणि नाशिकरोड(Nashikroad) या मुख्य डेपोमधून ९ बसेस दररोज सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये पहिल्या दिवशी आठशे तर दुसऱ्या दिवशी पंधराशे नाशिककरांनी प्रवासाचा लाभ घेतला. सर्व प्रवाशांना तिकिटे देण्यात येत होते पण पैसे मात्र घेतले गेले नाहीत....

नाशिक शहर बससेवेचे असे असेल भाडे; वनडे पाससह अनेक आकर्षक योजना
मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

नव्या कोऱ्या अत्याधुनिक धाटणीच्या बसेस (Upgraded Buses) रस्त्यावर धाऊ लागल्यानंतर नाशिककरांनी या बसेसचे तिकीट दर किती असतील याबाबतचे तर्कवितर्क समाजमाध्यमांत लढवले. मात्र, नाशिक शहरातील बससेवा अतिशय परवडणारी आहे. आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी महामंडळाकडून दर दोन किलोमीटरला ठराविक भाडे आकारण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या दोन किमीनंतर ४, ६, ८, १० आणि १२ किमीचे टप्पे करण्यात आले आहेत.

या बसमधून प्रवास (CNG Buses) करण्यासाठी मासिक पासची (Monthly Pass) सोयदेखील करून देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला शहरातील विविध भागात कामं असतील तर ती व्यक्ती दिवसभराचा पास काढून या बसमधून शहरात फिरू शकणार आहे.

तसेच तीन दिवसांचा पास नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. या पासमध्ये प्रवाशांना १२.५० टक्के सवलत देण्यात येईल. एखाद्या प्रवाशाला सलग सात दिवस या बससेवेचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांच्यासाठीदेखील विशेष व्यवस्था करून पास उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पासद्वारे प्रवाशी २६.८० टक्के सवलत मिळवू शकणार आहेत.

सर्व्हिस पासमध्ये (Service Pass) तीस दिवसांचा, ९० दिवसांचा आणि १८० दिवसांचा पास उपलब्ध करून देण्यात आला असून ३३.३३ ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत प्रवाशांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे, ५ वर्षांपासून ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना या बसमध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना या बसमधून ७५ टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे. तर त्यांना मदतनीस जे आहेत त्यांनादेखील या बसमधून अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल.

विद्यार्थ्यांसाठीच्या पासमध्ये एक महिन्याच्या कालावधीत २० दिवसांच्या तिकीट दरात ३० दिवस प्रवास तर ९० दिवसांच्या पाससाठी ५० दिवसांच्या तिकिटात ९० दिवस प्रवास असे नियम घालण्यात आले आहेत. यातून विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये ५० टक्के तर त्रैमासिक पासमध्ये ६६.६६ टक्के सवलत मिळणार आहे.

महापालिकेने (NMC) अडीचशे बस धावण्याचे नियोजन केले असले तरी पहिल्या टप्प्यात रन म्हणून ५० बस चालविण्यात येणार आहेत. बससेवेचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नाशिकच्या रस्त्यांवर ५० बसेस धावू लागल्यानंतर हळूहळू बस वाढविण्यात येणार आहेत. शहर बससेवा सुरू झाल्यामुळे नाशिककरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

किलोमीटर निहाय असे असतील तिकीटदर (Kilometre wise fare)

०-२ किलोमीटरला १० रुपये

२-४ किलोमीटरला १५ रुपये

४-६ किलोमीटरला २० रुपये

६-८ किलोमीटरला २५ रुपये

८-१० किलोमीटरला २५ रुपये

१०-१२ किलोमीटरला ३० रुपये

अशा आहेत सवलती (Discounts)

लहान मुले (५ ते १२ वर्षांपर्यंत) - ५० टक्के

अंध व अपंग - ७५ टक्के

मदतनीस - ५० टक्के

विद्यार्थ्यांसाठी काय? (For Students)

३० दिवसांच्या पाससाठी ५० टक्के सवलत

९० दिवसांच्या पाससाठी ६६.६६ टक्के सवलत

पासचा प्रकार -- किंमत -- सवलत

१. १ दिवसीय पास -- ७५ रुपये -- नाही

२. ३ दिवसीय पास -- २०० रुपये -- १२.५० टक्के

३. ७ दिवसीय पास -- ४०० रुपये -- २६.८० टक्के

४. ३० दिवसीय पास -- १ हजार ५०० रुपये -- ३३.३३ टक्के

५. ९० दिवसीय पास -- ३ हजार ७५० रुपये -- ४४.४४ टक्के

६. १८० दिवसीय पास -- ६ हजार ७५० टक्के -- ५० टक्के

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com