LIVE : नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा पाहा इथे

LIVE : नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा पाहा इथे

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या सीएनजी बसेसचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. महाकवी कालिदास कलामंदिर या दालनात या बसेसचा लोकार्पण सोहळा सुरु आहे. दालनाबाहेर उभ्या असलेल्या बसेसला हिरवा झेंडा दाखवून बसेस नाशिककरांसाठी आजपासून धावण्यास सज्ज होणार आहेत....

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सतिष कुलकर्णी आहेत.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत.

असा झाला सोहळा

रिमोटचे बटन दाबून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

कार डिझायनर असलेल्या चव्हाणके या तरुणाचा सत्कार

नगरसेविका वर्षा भालेराव यांनी विशेष पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या विशेष सत्कार करण्यात आला

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com