ग्रामीण भागातही रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात; पाहा आकडेवारी

ग्रामीण भागातही रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात; पाहा आकडेवारी
File photo

नाशिक | प्रतिनिधी

कडक लॉकडाऊन केल्यानंतर नाशिक शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. दररोज काही हजाराने वाढलेली रुग्णसंख्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून हजाराच्या आत आली आहे. रुग्णसंख्या घटत असली तरीदेखील मृत्यूदर मात्र वाढलेला असल्याने मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे...

आज जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७१५ ने घट झाली आहे. सद्यस्थितीत १५ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातून ३ लाख ६० हजार ६९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत ४ हजार ४१४ रुग्णांनी जिल्ह्यात प्राण गमावले आहेत.

पाहूयात तालुक्यातील आणि महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ६११, बागलाण ६८७, चांदवड ६३३, देवळा ५९९, दिंडोरी ७४८, इगतपुरी १३४, कळवण ५७४, मालेगाव ५१८, नांदगाव ४६५, निफाड १ हजार २६६, पेठ ५४, सिन्नर ८४०, सुरगाणा १९९, त्र्यंबकेश्वर ९०, येवला २०६ असे एकूण ८ हजार ६२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ५७५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४५ असे एकूण १५ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक ग्रामीण मधे ९२.४१ टक्के,

नाशिक शहरात ९६.६३ टक्के,

मालेगाव मध्ये ८९.०३ टक्के

जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के

एकूण जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.८३ इतके आहे.

रुग्ण दगावल्याची आकडेवारी

नाशिक ग्रामीण २ हजार १४५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ८७०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३०० व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ४१४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com