Video : आता पाळी नागरिकांची, स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळा

'एनसीएफ' अध्यक्ष हेमंत राठी यांचे आवाहन
Video : आता पाळी नागरिकांची, स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळा
File Photo

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोनाची स्थित बिकट होत चालली आहे. दररोज रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. राज्यात लॉकडाऊन असतानाही काहीही कारण सांगून नागरीकांची मोठी गर्दी अत्यावश्यक सेवांच्या दुकानात होताना दिसून येत आहे. त्यामुळे नाशिक सिटीझन फोरम (एनसीएफ) चे अध्यक्ष हेमंत राठी यांनी यांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले असून जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे...

एका व्हिडीओ च्या माध्यमांतून राठी यांनी नाशिककरांना संबोधित केले आहे. याद्वारे त्यांनी सांगितले की, नागरिकांनी काही दिवस जनता कर्फ्यू पाळून अनावश्यक गर्दी टाळावी. अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी गर्दी न करता नियम पाळावे. करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने जबाबदारीने वागले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com