किरणा सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंतच मिळणार; 'एनसीएफ'च्या आवाहानास प्रतिसाद

किरणा सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंतच मिळणार; 'एनसीएफ'च्या आवाहानास प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी

राज्यात इतर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत नाशकात करोना संसर्ग अधिक प्रमाणात वाढत चालला आहे. नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्ण अधिक असलेल्या तालुक्यात जनता कर्फ्यूचा चांगला परिणाम बघावयास मिळाला आहे. त्यामुळे किरणा दुकानदारांनी आजपासून सकाळी आठ ते १ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असून जनता कार्फ्युला ते पाठींबा देणार आहे. याबाबतची माहिती नाशिक सिटीझन फोरमचे (एनसीएफ) अध्यक्ष हेमंत राठी यांनी दिली...

ते म्हणाले, इतर शहरात जनता कर्फ्यूचे चांगले परिणाम बघावयास मिळाल्यानंतर नाशिक सिटीझन फोरमने व्यावसायिकांनी यात उत्स्फुर्तपणे उतरण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत व्यापारी संघटनांनी आजपासून सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत किराणा दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

तसेच दुध आणि भाजीपाला दुकाने सकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत सुरु ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी एक वाजेनंतर मेडिकल स्टोअर्स आणि हॉस्पिटलशिवाय इतर दुकाने उघडी राहणार नाहीत याची काळजी घेण्याचेदेखील राठी यांनी सांगितले.

उद्योजकांनी देखील स्वत:हून पुढे येत आपले उद्योग पुढील दहा दिवस बंद ठेवावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. जनता कर्फ्यू पाळला तरच रुग्णसंख्या घटेल व आत्ता जे रुग्ण आहेत त्यांना योग्य उपचार मिळेल हा यामागील उद्देश असल्याचे एका व्हिडीओ द्वारे एनसीएफचे अध्यक्ष राठी यांनी सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com