घरात लहान मुलं आहेत, काय करावे करोना काळात? जाणून घ्या सविस्तर

घरात लहान मुलं आहेत, काय करावे करोना काळात? जाणून घ्या सविस्तर

नाशिक। प्रतिनिधी Nashik Covid 19

सध्या कोविड 19 (Covid 19) या आजाराच्या साथीच्या (Corona Outbreak) दुसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक पालक भयग्रस्त आहेत. परंतु मुलांची केवळ काळजी करू नका तर योग्य ती दक्षता घेऊन करोनापासून मुलांना दूर ठेवा, असे आवाहन बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी देशदूतशी (Deshdoot) बोलताना केले...

घरात लहान मुलं आहेत, काय करावे करोना काळात? जाणून घ्या सविस्तर
महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी
Q

मुलांची चाचणी केली पाहिजे का?

A

हो. घरातील एक व्यक्ती जर करोनाबाधित आढळली तर घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून घेणे गरजेचे असते. अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा लागण होऊ शकते.

Q

मुलांमधील आजाराची लक्षणे काय?

A

सर्वसाधारणपणे कुठल्याही फ्लू सारखीच असतात. म्हणजे, सर्दी, ताप खोकला, घशात खवखव, जुलाब इ. बरीच मुले लक्षणविरहित देखील असतात.

Q

मुले गंभीर आजारी होऊ शकतात का?

A

अगदी क्वचित. सुमारे नव्वद ते 95 टक्के मुले दोन तीन दिवसांत पूर्ण बरी होतात. बहुतांश मुले काही आठवड्यात बरी होतात.गंभीर आजारी होण्याची शक्यता 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जर काही सहव्याधी नसेल तर रुग्णालयात दखल करण्याची गरज पडत नाही.

Q

मुलांमध्ये गंभीर स्वरूपाचा आजार कधी होऊ शकतो?

A

काही सहव्याधी म्हणजे, किडनी, यकृत, हृदय यांचा आजार, मधुमेह, स्थूलता, कुपोषण, कॅन्सर, प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे सुरू असणे इ., असल्यास अशा परिस्थितीत गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचे प्रमाण अधिक असते.

Q

मुलांचे विलगीकरण कसे करावे?

A

जर आई, वडील, आजी, आजोबा असे कुणीही बाधित असतील तर त्यांच्या समवेत मुलांना राहू द्यावे. तसेच मुले बाधित नसतील पण खूप लहान असतील तरीसुद्धा त्यांना बाधित पालकांसोबत राहू द्यावे. कारण त्यांना संसर्ग झाला असूनही चाचणीचा अहवाल नकारात्मक असू शकतो.

Q

तान्ह्या बाळाला बाधित आईने अंगावर पाजावे का?

A

नक्कीच पाजावे. आईच्या दुधातून हा विषाणू पसरत नाही. फक्त आईने तोंडाला मास्क लावून बाळाला सांभाळावे.

Q

मुलांच्या आजाराला औषध आहे का?

A

लक्षणविरहित मुलांना काहीही औषधाची गरज नसते. सौम्य लक्षणे असल्यास साधे तापाचे, पॅरॅसिटॅमॉलचे औषध, डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे. झिंक आणि जीवनसत्व दिल्यास हरकत नाही. अँटी फ्ल्यू, रेमडेसिविर किंवा स्टिरॉइड अशा औषधाची गरज सहसा नसते. ती फक्त रुग्णालयात दाखल रुग्णांनाच दिली जाऊ शकतात.

Q

मुलांमध्ये जर जास्त आजार होत नाही तर त्यांची तपासणी का करावी?

A

कारण, मुले बाधित असल्यास त्यांना जास्त गंभीर स्वरूपाचा आजार होत नाही परंतु ती ‘अती वाहक’ असतात. मुले जोरात बोलतात, ओरडतात, रडतात किंवा शिकताना, खोकताना तोंडावर हात ठेवत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

Q

करोनाबाधित मुलांचा छातीचा स्कॅन किंवा रक्त तपासण्या कराव्यात का?

A

जास्त तीव्र स्वरूपाचा आजार असेल तरच या तपासण्या कराव्यात आणि ते तुमच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. ना ठरवू द्या. खूप कमी वेळा या सगळ्यांची गरज पडते.

Q

मुलांसाठी लस उपलब्ध आहे का?

A

सध्यातरी नाही. काही देशात दहा ते पंधरा वर्षे या वयोगटात लसीच्या चाचण्या चालू आहेत.पण अजून त्याचे निष्कर्ष उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्यातरी मुलांना आजारी व्यक्ती चा संपर्क होणार नाही, याची काळजी घ्यावी.

घरात लहान मुलं आहेत, काय करावे करोना काळात? जाणून घ्या सविस्तर
महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com