सुप्रसिद्ध उद्योजक राधाकिसन चांडक यांचे निधन

सुप्रसिद्ध उद्योजक राधाकिसन चांडक यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी

सिन्नरच्या विकासात मोलाचा हातभार लावणारे उद्योजक राधाकिसन चांडक यांचे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते...

राधाकिसन चांडक यांनी वडिलांनी सुरू केलेल्या कोंबडा बिडी या उद्योगाला गती दिली. तसेच त्यांनी नाशिकसह राज्यभरात पंचवटी हॉटेलची मालिका उभारली.

सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर राहत होते. महाराष्ट्र महेश सेवा निधी या संस्थेच्या अध्यक्षपदावरून विधवा महिलांना पेन्शन योजना लागू करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे.

नाशिक, सिन्नर, संगमनेर आदी परिसरातील विविध संस्थांना खूपच दानामध्ये मदत करण्यात त्यांचा आग्रह होता.

नाशिकच्या सांस्कृतिक चळवळीत अग्रस्थानी असलेल्या संस्कृती वैभव या संस्थेचे ते कार्यध्यक्ष मार्गदर्शक व जेष्ठ सदस्य म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. मित्र जोडण्यावर नेहमी त्यांचा भर असायचा त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com