नाशिक बस दुर्घटना : छगन भुजबळांकडून घटनास्थळाची पाहणी

नाशिक बस दुर्घटना : छगन भुजबळांकडून घटनास्थळाची पाहणी

नाशिक | प्रतिनिधी | Naashik

आज पहाटे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे....

तर ३८ जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

नाशिक शहरात नांदूरनाका परिसरात सकाळी ट्रेलर आणि खाजगी बस यामध्ये घडलेली भीषण अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. बसने पेट घेतल्यामुळे काही प्रवाशांचा जागीच होरपळुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे त्यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com