...अखेर डाॅक्टर वधूची कौमार्य चाचणी रोखली

...अखेर डाॅक्टर वधूची कौमार्य चाचणी रोखली
संग्रहित

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील (Nashik Trimbakeshwar Road) एका हाॅटेलमध्ये उच्च शिक्षित (Well Educated) वधु -वराचा विवाह सोहळा आज सायंकाळी पार पडला. जात पंचायतच्या पंचांकडून डाॅ. असलेल्या नववधूची लग्नानंतर कौमार्य चाचणी (Virginity Test) घेण्यात येणार असल्याबाबतची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस प्राप्त झाला होता...

त्यानुसार, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात विनंती अर्ज दिला होता. अशी कुप्रथा थांबविण्याची विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे (Police Inspector Sandip Randive) यांनी सदर हाॅटेल मालकाला नोटीस बजावली.

काही अनुचित प्रकार झाल्यास हाटेल मालकाला जबाबदार ठरविण्यात येईल असे नोटीसमधून कळविले होते. त्यानंतर आज सायंकाळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे आपल्या सहकार्यांसोबत विवाहस्थळी दाखल झाले.

अशी कौमार्य चाचणी चाचणीबाबत त्यांनी शहानिशा करून, संबंधितांचे जबाब घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अशी काही परीक्षा होत नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते. जात पंचायतींच्या पंचांनी कानावर हात ठेवून अशी कौमार्य चाचणी होत नसल्याचे सांगितले.

पोलीसांनी कायद्याची जाणीव करून दिल्यावर अशी कौमार्य परीक्षा होत नसल्याचे व करणार नसल्याचे लेखी लिहून दिल्याचेही समजते.

मात्र, समाजातील अनेक बांधवांच्या अशा तक्रारी आहेत. जातपंचायतीच्या दबावाखाली ते असल्याने समोर येत नाहीत. मात्र महाराष्ट्र अंनिस अशा पिडींतांना पुन्हा आवाहन करून, हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करणार आहे.

समितीच्या कार्यकर्त्यांनी आज क्रूर प्रथेविरुद्ध समाजात पुन्हा प्रबोधन,जनजागृती साठी प्रयत्न केले आहे. पोलिसांचेही सहकार्य लाभले आहे. संघटनेच्या वतीने पोलिसांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

पोलीसांनी या प्रकारात व्यवस्थित लक्ष घालावे यासाठी विधानसभेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी कृतीशील हस्तक्षेप केला होता. व पोलिसांना सुचना केल्या होत्या.

या मोहिमेत डाॅ.टी .आर .गोराणे, कृष्णा चांदगुडे, अॅड.समीर शिंदे,नितीन बागुल, महेंद्र दातरंगे कृष्णा इंद्रीकर, संजय हराळे, दिलीप काळे आदी कार्यकर्ते सहभागी होते. हा अंनिसच्या जात पंचायत विरोधी लढ्याचा विजय असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com