जहांगीर मशीन कब्रस्तानात कबर खोदण्याचे काम करणारे फिरोज शेख असिफ शेख यांचा सत्कार करताना युनिटी फाउंडेशनचे पदाधिकारी.
जहांगीर मशीन कब्रस्तानात कबर खोदण्याचे काम करणारे फिरोज शेख असिफ शेख यांचा सत्कार करताना युनिटी फाउंडेशनचे पदाधिकारी.
नाशिक

नाशकात कबरी खोदणाऱ्या तरुणांचे हात झाले 'दगड'

करोना योद्धा म्हणून 'त्यांचा' गौरव

Farooque Pathan

Farooque Pathan

नाशिक | फारूक पठाण

करोनामुळे मोठ्या प्रमाणात लोक दगावल्याने मागील सुमारे पाच महिन्यात जुने नाशिक परिसरात 300 पेक्षा जास्त कबरी खोदण्यात आल्या आहेत.

यामुळे कबरी खोदणाऱ्या तरुणांचे हात देखील दगडा प्रमाणे कडक झाले आहे. कबर खोदणाऱ्या तरुणांच्या या जिगरबाज कामगिरीमुळे हे लोक देखील करोना योध्दाच असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. युनिट अमन फाउंडेशनच्या वतीने गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाशिक शहर परिसरातील मुस्लिम वस्ती लक्षात घेऊन दरवर्षी सुमारे 200 च्या जवळपास कबरी खोदण्यात येतात, मात्र मागील काही वर्षात मुस्लिम बहुल भागातील संख्येत वाढ झाल्यामुळे त्यात काहीशी वाढ झाली आहे, मात्र करोना काळात मृतांच्या अकड्याने उच्चांक गाठला.

करोनाचे संक्रमण फैलावल्याने करोनाबाधितांचे मृत्यूही झटपट होऊ लागल्याने कब्रस्तानावर ताण आला; मात्र मयतांचा अखेरचा प्रवास सुखकर करण्याचा विडा उचलणाऱ्या तरुणांनी कसलीही तमा न बाळगता एखाद्या योद्धयाप्रमाणे कबरींच्या खोदकामासाठी स्वतःला झोकून दिले होते. 

चौक मंडई जहाँगीर मशीद कब्रस्तानात फिरोज शेख व आसीफ शेख हे मित्र एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून झटत आहेत. त्यांनी जवळपास २५ वर्षांपेक्षाही अधिक काळ या कामात घालविला. करोनाचा आजार जसा शहरात तेजीने वाढला तसे मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे त्यांनी सांगितले.

करोना बाधितांपाठोपाठ नैसर्गिक कारणांमुळे किंवा अल्पशा आजाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढली आहे. जहाँगीर मशीद कब्रस्तानसह काही ठिकाणी मार्च महिन्यापासून आता पर्यंत सुमारे 300 च्या जवळपास दफनविधीझाला आहे.

२५ वर्षाच्या काळात कधीही बारा ते पंधरा तासांत पंधरा कबरींचे खोदकाम केले नव्हते, मात्र करोना काळात तसाही अनुभव आम्हाला आला. दिवस उगविल्यापासून कबर खोदू लागलो ते मध्यरात्री तीन वाजता १५वी कबर खोदून झाली’, असे फिरोज सांगतात. सतत कबरींचे खोदकाम करत आहेत.

गत काही महिन्यांमध्ये त्यांच्या हातांना अजिबात विश्रांती लाभलेली नाही. यामुळे अक्षरक्ष: त्यांचे तळहात एखाद्या दगडा प्रमाणे झाले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना युनिटी अमन फाउंडेशनच्या वतीने करोना योद्धा म्हणून त्यांच्या सत्कार करण्यात आला, यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष साजिद मुलतानी, शौकत सय्यद, बाबा कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते.

नैसर्गिक मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची कबर साडेतीन ते चार फूटांपर्यंत खोदावी लागते; मात्र करोनाबाधितासाठी सुमारे साडेसातफूट खोल कबर खोदून हायपोक्लोराईडची फवारणी करत पीपीई सूट परिधान करून दफनविधी होते. दरम्यान रफिक साबीर, रिजवान खान यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते देखील पुढे येऊन काम करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com