नवीन बिटको हॉस्पिटलची नगरसेविकेच्या पतीकडून तोडफोड

नवीन बिटको हॉस्पिटलची नगरसेविकेच्या पतीकडून तोडफोड

नाशिकरोड l प्रतिनिधी

बिटको हॉस्पिटलमध्ये रेमडीसीवर इंजेक्शन मिळत नसल्याचा आरोप करत व रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत स्वतःच्या गाडीने मेन गेट ची केली तोडफोड केल्याची घटना घडली.

नवीन बिटको हॉस्पिटलची नगरसेविकेच्या पतीकडून तोडफोड
बिटको तोडफोड प्रकरण: कोण आहेत राजेंद्र ताजणे ? का केला असा प्रकार?

नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती कन्नू ताजणे यांनी चार चाकी थेट प्रवेशद्वारातून काचेच्या प्रवेशद्वारातून घातली. त्यामुळे सर्वत्र काचांचा खर्च पडला होता.

या घटनेनंतर कनू ताजने हे तेथून पसार झाले आहेत. ही घटना नाशिक रोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले नवीन सेंटरच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात काचांचा खच पडलेला आहे

काचेच्या प्रवेशद्वारातून गाडी आत मध्ये का घातली? याबाबतचे निश्चित कारण समजू शकले नाही. रेमडीसीवर इंजेक्शन ऑक्सीजन व व्हेंटिलेटर वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत तोडफोड केली.

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ज्या वेळी हा प्रकार घडला त्यावेळी फक्त तीन सुरक्षा गार्ड प्रवेशद्वारावर हजर होते. घटनास्थळी महापौर सतीश कुलकर्णी दाखल झाले असून आयुक्त कैलास जाधव हेदेखील घटनास्थळी आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com