नाशिक लॉकडाऊन शिथिल : लग्न समारंभ, लॉन्स, क्रीडांगणासंदर्भात असा हा निर्णय

अत्यंविधीसाठी असे आहेत नियम
नाशिक लॉकडाऊन शिथिल : लग्न समारंभ, लॉन्स, क्रीडांगणासंदर्भात असा हा निर्णय

नाशिक

नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर दुपारी ३ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु असेल.

नाशिक लॉकडाऊन शिथिल : लग्न समारंभ, लॉन्स, क्रीडांगणासंदर्भात असा हा निर्णय
नव्या ‘ब्रेक द चेन’चे काय आहेत नियम जाणून घ्या

लग्नासमारंभामुळे कोरोनाचा धोका जास्त वाढत असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे लग्न समारंभासाठी नियमावली कठोरच राहणार आहे. लग्न, सर्व प्रकारचे स्वागत समारंभ यासाठी हॉल, मंगलकार्यालये, लॉन्स बंदच राहणार आहे. परंतु पाच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करता येणार आहे.

अत्यंविधीसाठी २० जण

अत्यंविधीसाठी जास्तीत जास्त २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यानंतरच्या विधीसाठी जास्तीत जास्त १५ जण उपस्थित राहू शकतील.

क्रीडांगणे, चित्रपटगृह बंदच

क्रीडांगणे, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंदच राहणार आहे. तसेच करमणूक केंद्रही बंद राहतील. चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह, कलाकेंद्र बंदच राहणार आहे.

शाळा, कोचिंग बंदच

सर्व प्रकारच्या शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस बंदच ठेवले आहे. पुर्वीप्रमाणे ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण सुुरु राहणार आहे.

नाशिक लॉकडाऊन शिथिल : लग्न समारंभ, लॉन्स, क्रीडांगणासंदर्भात असा हा निर्णय
नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल; काय सुरु काय बंद पाहा इथे
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com