१२ आमदारांचे निलंबन : पंचवटी कारंजा परिसरात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

१२ आमदारांचे निलंबन : पंचवटी कारंजा परिसरात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

पंचवटी | वार्ताहर Panchvati

भाजपच्या (Bhartiy Janta Party) बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नाशिक भाजप युवा मोर्चाच्या (Nashik BJP yuva morcha) वतीने पंचवटी कारंजा (Panchvati Karanja) येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी केलेली बघायला मिळाली.

आमदार निलंबन प्रकरणी भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांचे पुतळे दहन करण्यात येत आहेत.

आज भाजप युवा मोर्चाच्यावतीने (BJP yuva morcha) पंचवटी कारंजा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पुतळा जप्त करण्यात आला आहे.

जोपर्यंत त्या 12 आमदारांचे निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. (Agitation in nashik)

आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुनील केदार, मनिष बागुल, ऋषिकेश आहेर, निखिलेश गांगुर्डे, संदीप शिरोळे, सुमित नहार, प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, राम डोबे, विकी पाटील, भुषण शहाणे, विनोद येवले, निलेश चौधरी, हर्षल वाघ, पवन गुरव, विजय बनछोडे आदींसह भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com