नाशिक-भुसावळ एक्स्प्रेस उद्यापासून सुरू

नाशिक-भुसावळ एक्स्प्रेस उद्यापासून सुरू

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

भुसावळ-इगतपुरी मेमो एक्सप्रेस (Bhusawal-Igatpuri Memo Express) 10 जानेवारीपासून सुरू होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) दिल्याने जिल्ह्यातील निफाड (niphad), नांदगाव (nandgaon), लासलगाव (laslgaon), मनमाड (manmad) तसेच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister of State for Railways Raosaheb Danve) यांची दिल्ली (delhi) येथे खा.डॉ.भारती पवार (dr. bharti pawar) यांनी भेट घेतली होती. एक्सप्रेसला मेलचे तिकीट आकारले जाणार असून ती सात स्थानकांवर थांबणार आहे.

रेल्वे सेवा (Railway service) सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यासह (nashik district) खांदेशातील हजारो नागरिकांना या एक्सप्रेसने प्रवास करणे सोयीचे होणार आहे. मेमो एक्सप्रेस (Memo Express) ही भुसावळ जंक्शनवरुन (Bhusawal Junction) सकाळी 7 वाजता सुटेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी सकाळी 9.15 वाजता इगतपुरी (Igatpuri) येथून सुटणार आहे.

तर भुसावळ जंक्शन येथे 5.10 वाजता पोहचेल. आठ डब्ब्याची ही रेल्वे एक्सप्रेस असेल. तसेच कामयानी एक्सप्रेस (11071 व 11072) चा लासलगाव (lasalgaon) व नांदगाव (nandgaon) येथील थांबा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.

तसेच लोकमान्य टिळक टर्मिनल ते मनमाड जंक्शन (Lokmanya Tilak Terminal to Manmad Junction) दरम्यान धावणारी गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस (Godavari Superfast Express) (12117) व (12118) काही काळापूर्वी बंद करण्यात आली आहे. ती पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी जेणेकरून या गाडीने दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com