दीपावलीत नाशिक बाजार समिती सुरू राहणार

दीपावलीत नाशिक बाजार समिती सुरू राहणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्यानी बाजार समिती APMC दिवाळीच्या पार्श्वभूमीवर Diwali Festival दहा दिवस बंद ठेवणार असल्याचे घोषित केले असले तरी एन दिवाळीत भाजीपाला सडून शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती Nashik APMC बंद राहणार नसल्याचे सांगण्यात आले .

याबाबत आडतदारानी शनिवार आणि रविवारी समिती बंद दिवाळी सणाची तयारी सुरु झाली असून सर्व नागरिक दिवाळीच्या स्वागतासाठी तयारीला लागले आहे . यासाठी अनेक आस्थापनांनी आपल्या कर्मचार्‍यांना दिवाळीच्या सुट्या जाहीर केल्या आहे . त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांनी दिवाळी निमित्त बाजार समित्यांमधील व्यवहार दहा दिवस बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे .

मात्र,या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव मोठ्या प्रमाणात होत असते . कांदा हा साठवणूक केल्यास खराब होत नसल्याने शेतकर्‍यांना देखील त्याचा फारसा मात्र,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असल्याने बाजार समिती बंद ठेवल्यास शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते . ऐन दिवाळीत त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ शकतात याचा विचार करून समितीने अद्याप बाजार समिती कुठल्याही प्रकारे बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतलेला नाही .

मात्र,समितीमधील आडतदारानी शनिवार 6 नोव्हेंबरला भाऊबीज असून दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने या दोन दिवशी बाजार समिती बंद ठेवावी असे पत्र बाजार समिती प्रशासनाला दिले आहे . याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसून सर्वांशी चर्चा करून येत्या काही दिवसात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com