नाशिक बाजार समिती निवडणुक: तिसऱ्या दिवशी 'इतक्या' उमेदवारांचे अर्ज दाखल

नाशिक बाजार समिती निवडणुक: तिसऱ्या दिवशी 'इतक्या' उमेदवारांचे अर्ज दाखल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) १९ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिस-या दिवशी

तब्बल 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. बाजार समितीचे माजी उपसभापती संजय तुंगार, माजी संचालक शंकर धनवटे यांसह सर्वसाधारण गटातून धनाजी पाटील, अनिल ढिकले तर, विमुक्त जमाती भटक्या जमाती गटातून प्रल्हाद काकड यांनी अर्ज दाखल केले .

बाजार समितीच्या संचालक पदाच्या (Director Posts of Market Committee) १९ जागांसाठी निवडणुक (election) प्रक्रीया सुरू असून 27 मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी एक, दुस-या दिवशी दोन, तर तिस-या दिवशी 12 असे एकूण 15 अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत. बुधवारी (दि.२९) माजी संचालक संजय तुंगार, शंकर धनवटे यांनी अर्ज दाखल केले. शिंदे- शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांनी अर्ज दाखल करत रिंगणात उतरले आहेत.

विमुक्त जमाती भटक्या जमाती (nomadic tribes) गटातून नाशिक तालुका (nashik taluka) संघाचे माजी अध्यक्ष प्रल्हाद काकड यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यास चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. माजी सभापती तथा माजी खासदार देविदास पिंगळे (MP Devidas Pingle) यांच्या गटातील इच्छूकांकडून शुक्रवारी (दि.31) अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. तर, खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), माजी सभापती शिवाजी चुंभळे गटातील उमेदवारांकडूनही अर्ज दाखल करण्याची तयारी झाली आहे.

यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

  • विमुक्त जमाती भटक्या जमाती - प्रल्हाद काकड.

  • इतर मागासवर्ग मतदार संघ - धनाजी पाटील.

  • सर्वसाधारण - धनाजी पाटील, अनिल ढिकले, शंकराव धनवटे,संजय तुंगार,

  • प्रभाकर माळोदे,उत्तम खांडबहाले,राजाभाऊ ढगे.

  • शेतकरी सर्वसाधारण - प्रभाकर माळोदे,

  • ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक - सदानंद नवले,

  • ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती - यमुना जाधव.

तीन दिवसात 166 अर्जाची विक्री

नाशिक बाजार समिती निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत असताना दुसरीकडे, अर्ज विक्री मोठी होत आहे. गत तीन दिवसात 18 जागांसाठी तब्बल 166 अर्जाची विक्री झाली आहे. यात पहिल्या दिवशी 56, दुस-या दिवशी 44 तर बुधवारी तिस-या दिवशी 66 अर्जाचा समावेश आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com