यॉर्क वायनरी होणार सुला विनयार्डमध्ये विलीन

यॉर्क वायनरी होणार सुला विनयार्डमध्ये विलीन

नाशिक | प्रतिनिधी

भारतातील वाईनरी सुला विनयार्डने नाशिक येथील यॉर्क वाईनरीचे आपल्यासोबतच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. लवकरच यॉर्क वायनरीवर सुलाची संपूर्ण मालकी प्रस्थापित होणार असल्याची माहिती सुलाकडून देण्यात आली आहे...

सुला विनयार्डचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत यांनी सांगितले की, हे विलीनीकरण यॉर्क, सुला आणि वाइन ग्राहकांचे यश आहे. “छोट्या वाईनरींना बाजारात स्थान मिळवणे फारच अवघड असते आणि त्यातच करोनाच्या साथीमुळे वाईन उद्योगास मोठा धक्का बसला आहे.

सुला कैलाश गुरनानी यांची वाईनमेकर आणि ब्रँड अँबेसेडर नियुक्ती कायम ठेवणार असून, सुला ही यॉर्कला अधिक व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यास आणि गुरनानी कुटुंबाची वाईन उत्पादन करण्याची परंपरा कायम ठेवण्यास मदत करेल असे ते म्हणाले.

यॉर्क वायनरीच्या लेबलचे हक्क देखील सुला यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत. “आम्ही आमच्या शेजारीच असलेल्या यॉर्ककडे आमचे हॉस्पिटॅलिटी विभागाचे कामकाज देखील विस्तारित करणार आहोत ज्यामुळे नाशिकच्या वाईन पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे.

तसेच कामकाजाच्या एकत्रीकरणातून अधिक चांगला समन्वय साधण्यात येणार आहे. देशभरातील अधिकाधिक ठिकाणी यॉर्कचे ब्रँड उपलब्ध होणार असून वाईनप्रेमींना त्याचा लाभ घेता येणार आहे. हा एकंदरीत सर्वांसाठी एक सुवर्णमध्य साधला जाणार आहे” असे राजीव सामंत यांनी सांगितले.

यॉर्क वायनरीचे डायरेक्टर रवी गुरनानी यांनी विलीनीकरणाची तपशिलात माहिती दिली नाही, परंतु यॉर्कचा ब्रँड अजूनही वाढतच जाईल, असे सांगितले. “विलीनीकरण आमच्या ब्रँडला अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देईल आणि आमचे मार्केट देखील वाढवेल,असे ते म्हणाले.

या करारानुसार, सुला वाईन पर्यटनासाठी यॉर्कमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करू शकते ज्यात टेस्टिंग रूम आणि रेस्टॉरंट यांचा समावेश आहे. तसेच यॉर्क वाईनरीची उत्पादन क्षमता ४ लाख लिटर इतकी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com