नाशिक‘बार’ ची ५२५ वकिलांना मदत

अशी मदत करणारा पहिलाच वकिल संघ
जिल्हा न्यायालय
जिल्हा न्यायालय

नाशिक | Nashik

नाशिक बार असोिएशन व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने जिल्ह्यातील गरजु ५२५पेक्षा अधिक वकिलांना अन्न धान्याची मदत करण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक बार असोसिएशन व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने जिल्ह्यातील गरजु ५२५पेक्षा अधिक वकिलांना अन्न धान्याची मदत करण्यात आली आहे. दरम्यान वकिलांना अशा प्रकारे मदत करणारा नाशिक वकिल संघ पहिला ठरला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

करोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यासह संपुर्ण न्यायालये तेव्हापासून बंद आहेत. तर मे पासून हळू हळू लॉक डाऊन शिथिल करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. दोन महिन्यांपुर्वी पासून जिल्ह्यात अटी व शर्तींमध्ये न्यायालयीन कामकाज होत आहे.

मात्र जाचक अटींमुळे प्रत्यक्ष क्षमतेने न्यायालयाचे कामकाज सुरू झालेले नाही. याच्या परिणामी वकिलांवर गेली ५ महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. याचा सर्वात मोठा फटका ज्युनिअर व गरीब वकिलांना बसला आहे.

अशा वकिलांना मदत म्हणुन नाशिक बार असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत ३ वेळा प्रत्येकी १०० गरजु वकिलांना वस्तुंचे वाटप त्यंाच्या घरी जाऊन करण्यात आले आहे.

तर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या सहकार्याने सध्या २२५ वकिलांना याची मदत करण्यात येत आहे. अशा प्रकारे ५२५ वकिलांना आतापर्यंत मदत पोहचली आहे. ज्या वकिलांची स्थिती अडचणीची आहे अशा वकिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नितिन ठाकरे, खजिनदार ऍड. संजय गिते यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com