नाशिकच्या मंत्री पिता-पुत्राचा विक्रम; एकाच वेळी सर केले दोन वेगवेगळे शिखर

नाशिकच्या मंत्री पिता-पुत्राचा विक्रम; एकाच वेळी सर केले दोन वेगवेगळे शिखर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या आरव मंत्री (Aarav Mantri) याने नेपाळमधील सागरमाथा नैशनल पार्क (Sagarmatha National Park Nepal) येथील समुद्रसपाटीपासुन १९०४९ फुट (५८०६ मी.) उंच पोकाल्डे शिखर (Pokalde Nepal) एकट्याने यशस्वीरित्या सर केले. तसेच त्याचे वडील शिवलाल मंत्री (Shivlal Mantri) यांनी त्याच भागातील २००७५ फुट (६११९ मी.) उंचीचे लोबुचे पुर्व हे शिखर त्यांच्या चमुसोबत यशस्वीरित्या सर केल्याने मंत्री पिता पुत्राचे सर्वत्र स्वागत केले जात आहे....

अशोका युनिवर्सल स्कुल (Ashoka universal School) मधील आरव हा ईयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे, आरवची आई शिवानी मंत्री (Shivani Mantri) यांनी या मोहिमेची सर्व आखणी व अंमलबजावणी केली.

त्यांना जिप्सी ट्रेकर्स परिवार नाशिक (Gypsy trackers parivar nashik), तसेच 360 एक्स्प्लोररचे सीईओ आनंद बनसोडे (360 Explorer CEO Anand Bansod) यांचे सहकार्य लाभले. नाशिकहुन दिल्लीमार्गे (Delhi) काठमांडु (Kathmandu) प्रवास करत दोघा पितापुत्राने १३ ॲाक्टोबरला सोबतच त्यांच्या मोहिमेस सुरुवात केली.

नंतर २१ ॲाक्टोबरला विभक्त होऊन ते वेगवेगळ्या दिशेने निघाले. कडाक्याची थंडी, बर्फवर्षाव, घोंघावणारा वारा व समुद्रसपाटीपासुनची वाढती ऊंची या सर्व बाबींवर दोघा बापलेकांनी पुर्व तयारीनिशी यशस्वीरित्या झुंज देत ही मोहीम पुर्ण केली.

ऊल्लेखनीय बाब म्हणजे आरवने ही मोहीम एकटाच गिर्यारोहक त्याच्या सहायक शेर्पा समवेत पुर्ण केली. चढाईच्या दिवशी या दोघाव्यतिरिक्त तिसरे कुणीही तिथे नव्हते. पोकाल्डे पर्वत कमी गिर्यारोहक सर करतात. त्यामुळे बर्फातुन कुठलाही रस्ता नव्हता.

काही अंतरासाठी आरवच्या कमरेच्या वरपर्यंत बर्फ येत होते. तसेच शिवलाल यांचीही ६००० मी. पेक्षा जास्त ऊंच असणारी पहिलीच मोहीम होती. त्यांच्या या मोहीमा नाशिकच्या आरव एडवेंचर मार्फत आयोजित करण्यात आल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com