बाजारसमित्या सुरु; दहा दिवसानंतर शेतमाल विक्रीसाठी दाखल

बाजारसमित्या सुरु; दहा दिवसानंतर शेतमाल विक्रीसाठी दाखल

नाशिक | प्रतिनिधी

करोनाची त्सुनामी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेली कडक टाळेबंदी शिथिल केली आहे. त्यामुळे आज सोमवारपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या पूर्ववत झाल्या आहेत. त्यामुळे ठप्प झालेले अर्थचक्र फिरणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहणार आहेत...

गेल्या दहा दिवसांपासून भाजीपाला विक्रीवरही निर्बंध होते. आज सकाळी बाजारसमित्या पूर्ववत झाल्यामुळे लिलाव सुरु झाले आहेत. आज सकाळपासून बाजारसमित्यामध्ये शेतकऱ्यांनी माल विक्रीला आणला असून बाजारसमिती आवारात काम करणारे कामगारांनादेखील सकाळी तपासणी करून बाजारसमितीत प्रवेश देण्यात आला.

राज्य शासनाच्या निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, टाळेबंदी शिथिल करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे व्यापारी, उद्योजक व विविध संघटनांनी स्वागत केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु झाल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व शेती कामांनाही गती मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com