नाशकात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी; बाजारसमितीबाहेर बंदोबस्त तैनात, परिसर निर्मनुष्य

नाशकात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी;  बाजारसमितीबाहेर बंदोबस्त तैनात, परिसर निर्मनुष्य

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात कडक लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली आहे. घराकडे परतणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरील गर्दी वगळता संपूर्ण शहरात शुकशुकाट आहे. नाशिक शहरात सकाळी बाजार समितीत मोठी गर्दी होती.

यानंतर हळूहळू येथील गर्दी कमी झाली असून सकाळी साडेअकराच्या सुमारास संपूर्ण बाजारसमिती रिकामी झाली असून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याठिकाणी पोलिसांकडून बाजारसमिती लॉकडाऊन करण्यात आली असून परिसरात शुकशुकाट बघावयास मिळत आहे. दुसरीकडे रस्त्याने पोलीस अधिकारी रस्त्यावरून फेरफटका टाकत नियमांचे उल्लंघन तर होत नाहीये ना याचीही काळजी घेताना दिसुन येत आहे.

शहरातील मुख्य सिग्नल यंत्रणेनजीक पोलिसांनी ठाण मांडले असून पुढील काही वेळेतच याठिकाणी कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com