बाजारसमिती लॉकडाऊन; भाजीपाला कडाडणार

बाजारसमिती लॉकडाऊन; भाजीपाला कडाडणार

पंचवटी | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील ठिकठीकाणचा शेतमाल नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मार्केट यार्डात येतो. याठिकाणी बाजारसमिती बंद असल्याने शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आणता येत नाही. त्यामुळे शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होणार असून परिणामी दर काहीसे वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिक शहरात मार्केट यार्ड पूर्णपणे बंद आहे. परंतु याकाळात पंचक्रोशीतील शेतकरी शेतमाल शहरात विक्रीसाठी दुपारपर्यंत मुभा देण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ याकाळात घरोघरी जाऊन शेतकरी हा माल विक्री करू शकतात.

परंतु शेतकरी प्रत्येक गल्लीबोळात पोहोचेलच असे नाही. त्यामुळे शहरातील अनेक भागात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होणार असून लॉकडाऊन काळात भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com