नाशिक 'कृउबा' समिती निवडणूकीचा मार्ग मोकळा
नाशिक बाजार समिती

नाशिक 'कृउबा' समिती निवडणूकीचा मार्ग मोकळा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

तारीख पे तारीख करत वेळोवेळी मुदतवाढ मिळाल्यामुळे लांबलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Nashik apmc election) घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयोगाकडून (Election commission) जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार (Election time table) बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश हाय कोर्टाने (Mumbai High court) दिले आहेत. यामुळे निवडणुकीची अधिसूचना लवकरच निघणार असून पुढील महिन्यात म्हणजेत जानेवारीत मतदान होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे...

नाशिक बाजार समितीचा कार्यकाळ ऑगस्ट २०२१ (Aug 2021)मध्येच संपला आहे. करोनामुळे नाशिक बाजार समितीला दोन वेळा मुदतवाढ (two times extend elections due to covid 19) देण्यात आली. त्यानंतरही सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढून 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. न्यायालयाने यापूर्वी एका निकालात आधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सहकारी निवडणूक प्राधिकरणाने रद्द केला. विभागाने प्रारूप मतदार यादी जाहीर करणे आणि त्यावर हरकती मागणविणेही पुढे ढकलण्यात आले होते.

बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गट (Society group) आहे. करोनामुळे सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे या गटातील सदस्यांना बाजार समिती निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागले असते.

त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीआधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे पाहता जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलला होता. यामुळे नाशिकसह पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा बाजार समिती आदींची निवडणूक पुढे ढकलली गेली होती.

माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbale) यांनी कोर्टात याचिका बाजार समितीची निवडणूक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत समितीवर प्रशासक नेमावा, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत सध्या प्रशासक नेमणार नाही. ठरलेल्या वेळापत्रकानुसार बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत.

त्यामुळे आठडाभरात या निवडणुकीची पुन्हा एकदा अधिसूचना निघेल आणि जानेवारीत मतदान होईल अशी दाट शक्यता वर्तविली जाते आहे.

Related Stories

No stories found.