नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ जागांसाठी ९६.३४ टक्के मतदान झाले असून ३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. शनिवारी (दि.२९) सकाळी आठ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या सभागृहात मतमोजणीस सुरुवात होईल,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
१५ जागांसाठी ३७ उमेदवार
नाशिक बाजार समितीच्या १५ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. तीन जागा अगोदरच बिनविरोध आल्या आहेत. माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील 'आपलं पॅनल' आणि माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलमध्ये सरळ लढत आहे.यात सहकारी संस्थांच्या मतदार संघात ११ पैकी सर्वसाधारण सात जागांसाठी १८ उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी चार, इतर मागासवर्गीय एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती विमुक्त जमाती एका जागेसाठी दोन, उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघ चार जागांपैकी सर्वसाधारण दोन जागांसाठी सहा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती एका जागेसाठी दोन, आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी दोन असे एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत.
आपलं पॅनलचे उमेदवार
■ सोसायटी : सर्वसाधारण गट: देवीदास पिंगळे, संपत सकाळे, बहिरू मुळाणे, युवराज कोठुळे, तुकाराम पेखळे, उत्तम खांडबहाले, उत्तम आहेर
■ सोसायटी इतर मागासवर्गीय गट : दिलीप थेटे
■ सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती गट : विश्वास नागरे
■ सोसायटी महिला गट सविता तुंगार, विजया कांडेकर
■ ग्रामपंचायत सर्वसाधारण गट : जगन्नाथ कटाळे, विनायक माळेकर
■ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट : निर्मला कड
■ ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गट: भास्कर गावित
शेतकरी विकास पॅनल
■ सोसायटी : सर्वसाधारण गट शिवाजी चुंभळे, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, नामदेव बुरंगे, प्रभाकर माळोदे, गणेश तथा गणपत चव्हाण, शिवाजी मेढे
■ सोसायटी इतर मागासवर्गीय गट धनाजी पाटील
■ सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती गट प्रल्हाद काकड
सोसायटी महिला गट : कल्पना चुंभळे, शोभा माळोदे
■ ग्रामपंचायत सर्वसाधारण गट: तानाजी गायकर, प्रकाश भोये
॥ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट : सदानंद नवले
■ ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गट : यमुना जाधव
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..
केंद्रनिहाय झालेले मतदान टक्केवारीत
सहकारी संस्था -
जिल्हा परिषद शाळा गिरणारे - ९०.४२
पाथर्डी गाव -९८.३१
सिन्नर फाटा - ९९.२७
पेठ महाविद्यालय -९९.२०
जिल्हा परिषद शाळा ठाणापाडा -९५.८३
जिल्हा परिषद शाळा त्रंबकेश्वर - ८९.६०
एकूण -९५.६१
ग्रामपंचायत गट
जिल्हा परिषद,शाळा गिरणारे - ९८.८९
पाथर्डी गाव -९९.२०
सिन्नर फाटा - ९८.५६
पेठ महाविद्यालय -९२.४८
जोगमोडी -९५.८८
जिल्हा परिषद शाळा ठाणापाडा -९७.७०
जिल्हा परिषद शाळा त्रंबकेश्वर -९७.९१
एकूण ९६.८१
आठ टेबलवर होणार मतमोजणी
मतमोजणीसाठी आठ टेबल लावण्यात आले आहेत.याकरिता एक निवडणुक निर्णय अधिकारी, दोन सहायक निवडणूक अधिकारी, मत पत्रिका वर्गीकरण साठी एक तहसीलदार राहणार आहे. प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी व शिपाई आदींची नेमणूक करण्यात आली आहे.