नाशिकसह नगर जिल्ह्यातून चोरलेल्या दुचाकी हस्तगत

नाशिकसह नगर जिल्ह्यातून चोरलेल्या दुचाकी हस्तगत

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) गुन्हे शोध पथकाच्या गोपनीय माहितीवरून दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सहा दुचाकी हस्तगत केल्या...

पाथर्डी फाटा (Pathardi Phata) ते अंबडगावकडे (Ambad Gaon) जाणाऱ्या रस्त्यावर इंडो लाईन फर्निचरच्या कंपाऊंड लगत गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, किरण गायकवाड, जनार्दन ढाकणे, मुरली जाधव, मुकेश गांगुर्डे, अनिरुद्ध येवले, मच्छिंद्र वाघचौरे, नितीन सानप, हेमंत आहेर, राकेश राऊत, प्रमोद काशीद यांच्या पथकाने सापळा रचत संशयित आदित्य राजेंद्र घुमरे (19, रा. ओम साई अपार्टमेंट, फ्लॅट नंबर १, आनंद नगर, पाथर्डी फाटा, नाशिक ) व केतन गणेश भावसार ( 19, रा. स्वरांजली हॉटेल जवळ, मोंढे मळा, इंदिरानगर ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केली असता अंबड पोलीस ठाण्यातील एक मोटरसायकल, इंदिरानगर पोलिस ठाण्यातील (Indiranagar Police Station) तिन मोटारसायकल, सातपूर पोलीस ठाण्यातील (Satpur Police Station) एक मोटरसायकल व अहमदनगर जिल्हातुन (Ahemadnagar District) चोरून आणलेली व सध्या नाशिक येथे वापरत असलेली मोटरसायकल अशा सहा मोटारसायकली ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून एकूण २ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे सपोनी गणेश शिंदे यांच्या पथकाने आपले खबरी नेटवर्क ऍक्टिव्हेट करून पोलीस शिपाई प्रमोद काशीद व योगेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Related Stories

No stories found.