1 मे पासून ट्रु जेटची नाशिक-अहमदाबाद विमान सेवा

1 मे पासून ट्रु जेटची नाशिक-अहमदाबाद विमान सेवा

सातपूर | प्रतिनिधी

नाशिक अहमदाबात दरम्यानच्या विमान सेवेला पुन्हा एकदा हिरवा झेंडा मिळाला आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान नाशिक अहमदाबाद विमानसेवा ट्र्यू जेटच्या माध्यमातून सुरू होणार आहे....

करोनाच्या महामारीमुळे नाशिकची विमानसेवा ठप्प झाली होती. गुजरातमधून नाशिककडे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. राज्य शासनाने 1 मे पर्यंत खडक निर्बंध लागू केलेली असल्याने १ मे ते १५ मे दरम्यान ट्र्यू जेट या विमान कंपनीने बुधवार वगळता दररोज एक वेळ विमान सेवा सुरू केली आहे.

अहमदाबाद येथून सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी हे विमान नाशिकसाठी येणार आहे. तर नाशिकहुन अहमदाबादसाठी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी झेपावणार आहे.

रविवारी फक्त नाशिकहुन अहमदाबादसाठी विमान जाणार असून सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी अहमदाबादसाठी विमान जाईल. तर अहमदाबाद येथून सात वाजून पन्नास मिनिटांनी नाशिकला रवाना होणार आहे.

सध्या एकच विमान असल्याने आपली तिकिटे तातडीने आरक्षित करावीत असे आवाहन ट्र्यू जेट विमान कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com