
सातपूर | प्रतिनिधी Satpur
नाशिक विमानतळावरून अहमदाबाद, बंगळुरू, हैद्राबाद, पुणे, बेळगाव अशा शहरांना जोडणाऱ्या सेवा सुरू झाल्या होत्या...
हजारो नागरिक या विमान सेवेचा लाभ घेत होते. मध्यंतरी कोवीड महामारीमुळे विमान प्रवाशांमध्ये घट झाल्याने विमान कंपन्यांनी सेवा बंद केल्या होत्या.
मात्र ट्रू जेट या विमान कंपनीने नाशिक आमदाबाद विमान सेवा सुरू ठेवल्याने नागरिकांना सुविधा उपलब्ध झाली होती.
मागील महिन्यात नाशिक -आमदाबाद साठी 430 प्रवाशांनी लाभ घेतला अहमदाबाद-नाशिकला 489 प्रवाशांनी हा लाभ घेतला.
जून महिन्यापासून राज्यात सर्वत्र अनलॉक प्रणाली जाहीर करण्यात आल्याने येथे 15 जून नंतर बहुतांश विमान कंपन्या आपल्या विमानसेवा सुरू करणार असल्याचे वृत्त आहे.