भावेंचे 'ते' विधान निंदनीय, 'आआपा'कडून निषेध

शहर आम आदमी पार्टीचे निवेदन; पक्षाची भूमिका केली स्पष्ट
भावेंचे 'ते' विधान निंदनीय, 'आआपा'कडून निषेध

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर (Sunita dhangar, Education officer nmc nashik) यांच्याबद्दल आम आदमी पक्षाचे (आआपा) प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांनी आक्षेपार्ह विधान करत फेसबुक लाईव्ह (Facebook live) केले. वाईट साईट शब्दांत यावेळी भावे यांनी धनगर यांच्यासोबत वाद घातला होता. या प्रकारानंतर धनगर यांनी पोलीस ठाण्यात भावे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला....

दरम्यान, भावे यांनी या व्हिडीओमध्ये 'आआपा' पक्षाचा उल्लेख करत धनगर यांना अपशब्द वापरले होते. या प्रकारानंतर महापालिकेतील शिक्षक काळ्या फिती लावून आजपासून काम करत आहेत.

या प्रकारामुळे आआपा पक्षाची प्रतिमा मलीन झाली असल्यामुळे पक्षाच्या स्थापणेपासून पक्षासोबत काम करणाऱ्या शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी आज एक निवेदन दिले असून यानुसार, महापालिकेतील शिक्षण विभागात घडलेला प्रकार हा भावे यांचा वैयक्तिक होता. याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.

तसेच, अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, त्यांना जाब विचारणे यात काहीही गैर नसले तरी, महिला अधिकाऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरणे अतिशय निंदनीय असून भावे यांच्या या वक्तव्यांचा नाशिक शहर आम आदमी पार्टी तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे शहर आआपा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पक्षात सक्रीय असलेले जितेंद्र भावे यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे म्हटले जात असल्यामुळे ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर पक्ष काय निर्णय घेईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com