नाशिकच्या सई जोशीची नासातर्फे सिटीझन सायंटिस्ट म्हणून घोषणा

नाशिकच्या सई जोशीची नासातर्फे सिटीझन सायंटिस्ट म्हणून घोषणा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सई जोशी गेल्या आठ वर्षापासून हौशी खगोलशास्त्रज्ञ( Astronomer) म्हणून खगोलशास्त्राचा अभ्यास करत आहे.'नासा' ( NASA ) या अमेरिकेतील संस्थेतर्फे जून २०२१ मध्ये लघुग्रह संशोधनासाठी सिटीझन सायंटिस्ट प्रकल्प ( Citizen Scientist Project ) आयोजित केला होता.

त्यात खगोलमंडळ, नाशिक संस्थेची सभासद सई जोशी हिने भाग घेत केलेल्या संशोधनामध्ये एकूण ६ लघुग्रहांचा शोध नासा आणि हवाई वेधशाळेतर्फे अधिकृत मान्य झाला असून सई जोशी ची नासा सिटीझन सायंटिस्ट म्हणून घोषणा झाली आहे. तिच्या हया कामगिरी बद्दल सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तिच्यासोबत अजून १३ जणांचा गट बनविण्यात आला. या प्रकल्पामध्ये पहिल्या पाच दिवसांमध्ये संशोधन कसे करायचे याविषयी प्रशिक्षण दिले गेले. प्रकल्पामध्ये अमेरिकेतले हवाई राज्यातल्या स्टार वेधशाळेकडून मिळालेल्या डेटासेटचा सॉफ्टवेअरच्या मदतीने अभ्यास केला गेला.

या इमेजेसवर नासाने प्रक्रिया केली होती. निवडलेल्या गटातील प्रत्येक व्यक्तीने महिनाभर एकूण सात इमेजेसचा अभ्यास केला आणि सुमारे पन्नास संभाव्य लघुग्रहांची यादी नासाच्या आंतरराष्ट्रीय खगोलीय शोध सहयोग संस्थेला दिली.

त्यानंतर आठवडाभर वेधशाळेने या संभाव्य लघुग्रहांचा अभ्यास केला आणि त्यापैकी सहा नवीन लघुग्रहांचे संशोधन निश्चित केले व अधिकृत शोध म्हणून जाहीर केले आहे. पुढे ६ ते १० वर्षामध्ये नासामधील शास्त्रज्ञ या लघुग्रहाची कक्षा, त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर, त्यांची रचना अशा अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com