'नारीहर्ष'कडून महिलांना रोजगाराची संधी

'नारीहर्ष'कडून महिलांना रोजगाराची संधी

नवीन नाशिक | प्रतिनिधी

करोना महामारीमुळे (Covid 19) अनेक महिलांचे रोजगार (Women lose Job) गेले आहेत. या पार्श्वभूमीवर नारी हर्ष फाउंडेशन (Nari harsh foundation) तर्फे या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या करीता गणेशोत्सवासाठी श्री गणेशाच्या मूर्ती व त्यांची सजावट याचे अल्पदरात विक्री करण्यासाठीचा उपक्रम राबविला जात आहे....

यात मूर्तिकार महिला व खरेदी करणारे नागरिक या दोघांचाही फायदा होणार असून ना नफा ना तोटा (No profit no loss) या तत्त्वावर हा प्रकल्प नारी हर्ष फाउंडेशन तर्फे राबविण्यात येत आहे.

तरी गरजू महिलांना हातभार लागावा याकरिता नागरिकांनी शहीद सर्कल गंगापूर रोड (Shahid Circle Gangapur Road Nashik ), नाशिक व नारी हर्ष फाउंडेशन कार्यालय, अश्विन नगर नवीन नाशिक या ठिकाणी मूर्ती खरेदी यावे असे आवाहन नारी हर्ष फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. हर्षा फिरोदिया यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com