डॉ. वडगांवकरांचे पॅटन पाहण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष पोहचले रुग्णालयात

ॲडमिट नको, होम क्वारंटाइन व्हा
डॉ. वडगांवकरांचे पॅटन पाहण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष पोहचले रुग्णालयात

नाशिक। प्रतिनिधी:

नाशिकमध्ये हजारो रूग्णांना बरं करणाऱ्या डॉ. अतुल वडगांवकर यांची उपचार पध्दत नेमकी कशी ‌आहे? आपापल्या मतदार संघातील लोकांना त्याचा काय लाभ घेता येईल ? यासाठी आज अनेक लोकप्रतिनिधींनी एकत्र येत तेथे भेट दिली. ‘ॲडमिट नको, होम क्वारंटाइन व्हा’ हे डॉ. अतुल वडगांवकर यांचे पॅटन आहे.

डॉ. वडगांवकरांचे पॅटन पाहण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष पोहचले रुग्णालयात
महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आ. माणिकराव कोकाटे, आ. नितीन पवार, आ. दिलीप बनकर, आ. हिरामन खोसकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.

डॉ. अतुल वडगावकर यांनी ज्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा रुग्णांकरिता अनोखा उपाय सुचविला असून केवळ एक्स-रे व्दारे निदान करुन गृहविलगीकरणाव्दारे घरीच उपचार पध्दती अवलंबुन आता पर्यंत जवळपास दहा हजारंपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करुन कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

वैद्यकिय क्षेत्रातील अशा तज्ज्ञांचे‌ मार्गदर्शन घेवून असा प्रयोग विविध तालुके, ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी‌ तालुक्यात नागरिकांना परवडणारी उपचार पध्दती करणे शक्य आहे. म्हणूनच लोकप्रतिनिधींनी खास भेट दिली.

आ. कोकाटे यांनी थेट रूग्णांशीच केली. त्यासाठी डॉ. वडगावकर यांच्या रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत मंडप टाकण्यात आला होता. त्या मंडपात शिस्तीने उभे असलेल्या लोकांशी आमदार कोकाटे यांनी थेट चर्चेला सुरुवात केली. घरातील लोकांचा असलेला स्कोर, ऑक्सिजन लेव्हल याबाबतची माहिती घेऊन ती माणसं बरी झाली की नाही याची सविस्तर माहिती घेतली. हे सर्व झाल्यानंतर याबाबत दूरध्वनीवरून ते कुणाशी तरी बोलत होते. डॉ. वडगावकर यांच्या कामाची पद्धत, त्यांचा पँटर्न व उपचार पद्धती सिन्नर तालुक्यात कशी राबविता येईल याची चाचपणीही त्यांनी केली.

डॉ. वडगांवकरांचे पॅटन पाहण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष पोहचले रुग्णालयात
IMA चे केंद्र सरकारला खडे बोल, म्हणाले...

लोकप्रतिनिधींनी केला जिल्हाधिकाऱ्यांना फोन

डॉ. वडगावकर यांच्यामुळे रुग्णांना स्वस्तात उपचार पद्धती मिळाल्याने मोठ्या रुग्णालयात जाण्याचे अनेकांनी रद्द केले. त्यामुळे रुग्णांची लूटमार करणाऱ्या काही हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वडगावकरांना धमकीवजा सूचना देण्याचा प्रयत्न केले. याबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना मिळतात त्यांच्यापैकी आमदार कोकाटे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 'असे काही होत असेल तर आपण एकदा तरी डॉक्टर वडगावकर यांच्या विना कोविड सेंटर असलेल्या रुग्णालयास भेट द्यावी' अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपण भेट देणार असल्याचे मान्य केले.

आमदारांकडून चाचपणी

अनेक तालुक्यात कोरोना‌संक्रमित रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातारवण तयार झाले असल्याने नागरिक कोरोना चाचणी करत नसून शेतात व घरातच थांबुन राहत असल्याने रुग्णांमध्ये‌ विलक्षण वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कळवण तालुक्यात कोविडचे खाजगी दोन रुग्णालय ‌तर मानुर येथील डेडिकेटेड हेल्थ सेंटर येथे ३० बेडची क्षमता, अभोणा ग्रामिण रुग्णालयात ३० बेडची क्षमता तर सुरगाणा येथील ग्रामिण रुग्णालयात ३० बेडची रुग्णालय क्षमता असे नियोजन केलेले आहे. मात्र या ठिकाणी देखिल रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी न्यावे लागत आहे. मात्र तेथेही बेड उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे घरीच असे उपचार कसे देता येईल, याची चाचपणी आ. पवार यांनी केली.

ना. झिरवळ यांनी दिली मुख्यमंत्र्यांना माहिती

यासाठी जिल्हा परिषदे मार्फत सरकारी नियमांचे पालन करीत योग्य वेळी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी डॉ. अतुल वडगांवकर पॅटर्न राबवून केवळ एक्स-रे, आरटीपीसीआर टेस्ट करुन निदान व गृहविलगीकरण उपचार पध्दती सुरु करण्याबाबत आपल्यास्तरावरुन उपाययोजना करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. एवढेच नव्हे तर डॉ. वडगांवकर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी भेट घालून देण्याचे ठरले. आ. पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांशी झालेला पत्रव्यवहारच पत्रकारांना सादर केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com