नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचा डावा कालवा फुटला; हजारो क्युसेस पाणी वाया

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचा डावा कालवा फुटला; हजारो क्युसेस पाणी वाया

निफाड | प्रतिनिधी Niphad

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या (Nandurmadhyameshwar Dam) डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामातील (Rabbi season) पिकांसाठी शनिवार दि.5 फेब्रुवारी रोजी 300 क्यूसेकने दुसरे आवर्तन सोडले असता हे आवर्तन सोडून एकाच दिवसाचा कालावधी लोटत नाही तोच हा कालवा रविवार दि.6 रोजी रात्रीच्या सुमारास 7 कि.मी. म्हणजेच नांदूरमध्यमेश्वर इकडे वस्तीच्या पुढे म्हसोबा मंदिराजवळील असलेल्या या कालव्यावरील मोरीचा स्लॅब कोसळल्याने हजारो क्यूसेक पाणी वाया गेले आहे...

पाटबंधारे विभागाला (Irrigation Department) ही माहिती मिळताच त्यांनी रात्रीच हा कालवा (Canal) बंद केला असून तात्पुरत्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. कालवा फुटल्याने शेतकर्‍यांना (Farmers) आता रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.

ब्रिटीश काळात 1890 मध्ये नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या कामास सुरुवात करून हे धरण 1906 साली पुर्ण करण्यात आले होते. तर 1915 मध्ये या धरणाचा डावा कालवा 90 कि.मी. चा तर उजवा कालवा 110 कि.मी. लांबीचा तयार करण्यात आला होता. प्रारंभी उजव्या कालव्याची वहन क्षमता 600 क्यूसेक तर डाव्या कालव्याची वहन क्षमता 500 क्यूसेक होती. मात्र कालवे निर्मितीनंतर त्यांची दुरूस्तीच न केल्यामुळे या कालव्यांची वहन क्षमता घटली असून ती 300 क्यूसेक झाली आहे.

तसेच या कालव्यांची बांंधकामे जिर्ण झाली आहे. या कालव्यात बोरी, बाभळी, शेवाळ व पानगवतांनी बस्तान बसविले असून कालव्याचे भराव देखील कमकुवत झाले आहे. 20 हजार हेक्टर क्षेत्राला संजिवनी देणार्‍या या कालव्याकडे पाटबंधारे विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल (Revenue) मिळवून देणार्‍या कालव्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. मात्र वरवरची मलमपट्टी केली जात असल्याने हे कालवे आता ठिकठिकाणी फुटू लागले आहेत.

पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) रब्बी हंगामासाठी शनिवार दि.5 रोजी डाव्या कालव्यालला दुसरे आवर्तन 300 क्यूसेकने सोडले होते. मात्र हे कालव्याचे पाणी (Water) शेवटच्या टोकाला पोहचण्यापूर्वीच हा कालवा शनिवारी सायंंकाळी नांदूरमध्यमेश्वर शिवारातील इकडे वस्तीच्या पुढे असलेल्या म्हसोबा मंदिरा लगतच्या कालव्यावर असलेल्या जुन्या मोरीचा स्लॅब अचानक कोसळल्याने शेजारील नाल्यामधून हजारो क्यूसेक पाणी वाहून गेले आहे.

कालवा फुटल्याने आता रब्बी हंगामातील पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकर्‍यांना सतावू लागला आहे. कालवा फुटल्याची माहिती पाटबंधारे विभागाला मिळताच त्याच रात्री कालवा बंद करण्यात आला असून डाव्या कालव्याला पडलेले भगदाड बुजविण्याची मोहिम पाटबंधारे विभागाने युद्धपातळीवर सुरू केली आहे.

दुरूस्तीला मुहूर्तच नाही

ब्रिटीश काळात बांधलेल्या या कालव्यांना बोरी बाभळींचा वेढा पडला असून कालव्यात (canal) शेवाळासह पानवेलींनी बस्तान बसवले आहे. साहजिकच आता हे कालवे अवघे 300 क्यूसेकने वाहत आहे. पाटबंधारे विभागाला लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणार्‍या या कालव्यांकडे दुर्लक्ष झाल्याने ते आता ठिकठिकाणी फुटत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या कालव्यातील गाळ उपसा करून व खोली वाढवून भरावा दुरूस्त करणे गरजेचे आहे. तसेच पाटबंधारे विभागाने कर्मचार्‍यांना कालवा गस्तीसाठी याच धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे जुने रस्ते पुन्हा दुरूस्त करणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com