माणिकपुंज धरण, नांदगाव
माणिकपुंज धरण, नांदगाव|Digi
नाशिक

अखेर माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो

शेतकऱ्यांमध्ये समाधान

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव | Nandgoan

नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण अखेर ओव्हरफ्लो झाल्याने नांदगाव शहर तसेच तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा व सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने माणिकपुंज धरण भरल्याने या भागातील शेतकऱ्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. नांदगाव तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्याने दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असतात. मात्र मागील वर्षी पासून वरुणराजा बरसत असल्याने पाणीटंचाईचे संकट टळले आहे.

माणिकपुंज धरणाची ३३५ दशलक्ष घनफूट एवढी या धरणाची साठवण क्षमता आहे. गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने माणिकपुंज ओव्हरफ्लो झाले आहे. माणिकपुंज धरण हे जुलै महिन्यातच भरणारे धरण म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

तालुक्यातील पूर्व भागातील जळगांवबुद्रुक, न्यायडोंंगरी, पिंंपरखेड, मुळडोंगरी, सावरगाव, कासारी, बाणगांव, कसाबखेडा, जळगांव खुर्द, हिगणेदेहरेसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये सिचनासाठी उपयुक्त ठरले आहे. नांदगाव शहरासाठी पिण्यासाठी आरक्षित होत असल्याने दिलासा मिळाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com