करोना
करोना
नाशिक

नांदगाव पंचायत समितीत करोनाचा शिरकाव

ग्रामसेवकाचा अहवाल पॉझिटिव्ह

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव । Nashik

येथील पंचायत समिती मधील ग्रामसेवकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव तालुक्याचा ग्रामीण भागातील ग्रामसेवकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या सात झाली आहे.

करोनाचा संसर्ग हळूहळू ग्रामीण भागात हातपाय पसरतात दिसत असून यामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवाकडे लक्ष देणे गरजेचे असून करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांत जागरूकता निर्माण करून लोकणाच्या मनातील भीती दूर करणे गरजेचे आहे.

कारण शेतीचा हंगाम सुरू असून चांगल्या पावसामुळे शेतीपिके चांगल्या अवस्थेत असून शेतकऱ्यांची शेती कामे जोमात सुरू आहे. त्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. करोनाचे संकट ग्रामीण भागात जास्त प्रमाणात वाढल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.

त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन त्वरित उपयोजना करणे आवश्यक आहे.

Deshdoot
www.deshdoot.com