नांदगावनामा: पालिकेच्या 20 प्रभागांची रचना जाहीर

निवडणुकीची संभ्रमावस्था कायम; इच्छुकांचा हिरमोड
नांदगावनामा: पालिकेच्या 20 प्रभागांची रचना जाहीर

नांदगाव । संजय मोरे | Nandgaon

नांदगाव (nandgaon) नगरपरिषदेच्या (nagar parishad) विद्यामान नगरसेवकांचा (corporator) कार्यकाळ 28 डिसेंबररोजी संपुष्टात आला असून सध्या प्रशासकाची नियुक्ती (Appointment of Administrator) करण्यात आली आहे.

आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) नवीन प्रभाग रचनाही जाहीर करण्यात आली असल्याने इच्छूकांच्या मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला आहे. निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी त्या लांबणीवर पडण्याच्या शक्यतेमुळे इच्छुकांचा हिरमोडही झाला आहे.

निवडणूक आयोगच्या (Election Commission) वतीने नांदगाव शहराची प्रभाग रचना (Ward structure of Nandgaon city) जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेनुसार एकूण 23,604 मतदार असून 10 प्रभागांमधून 20 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी (political parties) कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यासह आपापल्या पक्षाचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना गतीही दिली आहे.

तथापि निवडणुका (election) वेळेत होतील कि सहा महिने लांबतील; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचे प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. नव्या रचनेत 2011 ची 23,604 ही लोकसंख्या गृहीत धरण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र जुन्या वॉर्डांचे क्रमांक बदलण्यासोबतच काही प्रभागातील भौगालिक सीमाही बदलण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. परिणामी जुन्या प्रस्थापितांपैकी काहींच्या मनसुब्यांना धक्का पोहचला आहे. त्यामुळे अनेकांना नव्याने सत्तेचा सारीपाट मांडून विजयाची गणीते मांडवी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेना (shiv sena), भाजप (bjp), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress), मनसेना (MNS), रिपाई (RPI), वंचित आघाडी आदींसह सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले असतानाच निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

नगरपरिषदेची निवडणूक (Municipal council elections) कधी होणार? याबाबत अद्याप स्पष्टता आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच शासनाने निर्धारित वेळेनुसार पालिकेतील नव्या प्रभाग रचनेचा अंतिम मसुदा जाहीर केल्याने इच्छुकांच्या गोटात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

आगामी नगरपरिषद निवडणुकीत निष्ठावानांना कितपत न्याय मिळेल, हे आताच सांगणे कठीण आहे. परंतु तिकीटासाठी निष्ठावंतांसह मागील पाच वर्षात कुठेही दिसून आले नाहीत, अशा व्यक्तीही आता सक्रिय झाल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक जण तयारीला लागले आहेत. पक्षाकडून तिकीट मिळण्यासाठी बड्या नेत्यांसह त्यांच्या नातेवाईकांमार्फत प्रयत्न सुरु झाले आहेत. हा प्रकार पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता निर्माण करणारा ठरत आहे.

कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. निष्ठावानांना डावलून तिकीट वाटप झाले तर त्याचा सर्वच पक्षांना फटका बसू शकतो. ओबीसी आरक्षणामुळे विधानसभेत राज्य शासनाने जोपर्यंत ओबीसी आरक्षण नाही तोपर्यंत नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुका नको, असे विधेयकच मंजूर करुन घेतले. विरोधी पक्षाने देखील त्यास पाठिंबा दिला असल्यामुळे नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाच ते सहा महिने उशीराने होण्याची शक्यता आहे.

प्रभागांची रचना: प्रभाग 1 : बौद्धनगर, ढासे मळा, लक्ष्मीनगर, दत्तनगर, खान्देशीवाडा, गुप्ता चाळ, कवडेनगर, महाजनवाडा, मालेगावरोड, जैन धर्मशाळा, इंग्लिश स्कूल. प्रभाग 2 : शनी चौक, आंबेडकर चौक, मस्तानी अम्मा, खराटे चाळ, जुनी कामगार चाळ, लोणार चाळ, जालना जीन, एस.टी. स्टॅण्ड, मोकळनगर, शांतीबाग, सुयोग कॉलनी. प्रभाग क्रमांक 3 : औरंगाबादरोड, आनंदनगर, नवीन वस्ती, हमाल वाडा, कैलासनगर, कोर्ट, नवीन तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय.

प्रभाग 4 : सानेगुरुजीनगर, महात्मा गांधी चौक, बेलदार गल्ली, कुंभार गल्ली, श्रीकृष्ण नगर, संभाजी नगर, जंगम गल्ली, न्हावी वाडा, बालाजी चौक, कासार गल्ली, महावीर मार्ग, जैन मंदिर, गणपती मंदिर. प्रभाग 5 : कासार गल्ली, सराफ बाजार, ओसवाल भुवन, दहेगाव नाका, होलारवाडा, तेली गल्ली, थत्ते वाडा, कोर्ट गल्ली, जामा मस्जिद, भेंडी बाजार, लक्ष्मी थिएटर, भोंगळेरोड, अहिल्यादेवी चौक. प्रभाग 6 : गुरुकृपा नगर, नरेंद्र स्वामी नगर, एकनाथ नगर, कालिका मंदिर, देवकर गल्ली, एकविरादेवी मंदिर,

गणेश नगर, मोमिन वाडा. प्रभाग 7 : पाटील गल्ली, देवी गल्ली, गल्ली नं. 3, होलार वाडा, द्वारकानगर, थत्ते वाडा. प्रभाग 8 : गुजरवाडी, पॉवर हाऊस, चांडक प्लॉट, पावर हाऊस प्लॉट, विजय ऑईल मिल, अ.करीम चाळ, शिंदे मळा. प्रभाग 9 : गांधी नगर, आनंद नगर, नवीन वस्ती, नेहरू नगर, पाण्याच्या टाकीजवळील भाग. प्रभाग 10 : एस. टी. कॉलनी, विवेकानंद मार्केट कमिटी, जय भोले नगर, गांधी नगरचा काही भाग.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com