नांदगाव : रेल्वे थांबे पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा : आ. कांदे

नांदगाव : रेल्वे थांबे पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा : आ. कांदे

मनमाड l Manmad (प्रतिनिधी)

रेल्वे प्रशासना तर्फे नांदगाव रेल्वे स्थानकावर ज्या गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला तो पुन्हा सुरु करण्यात यावा, मनमाड - कुर्ला गोदावरी एक्स्प्रेससह ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्वाची असलेली पैसेंजर तातडीने सुरु करण्यात यावी, नांदगाव, मनमाड रेल्वे स्थानकावरील रखडलेली विकासकामे सुरु करून चाकरमाने, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.

आदी मागण्या शिवसेना आ. सुहास आण्णा कांदे यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजयकुमार मित्तल यांची भेट घेवून केली. यावेळी आ. कांदे यांनी मित्तल यांना एक निवेदन ही दिले आहे. सर्व मागण्याचा सहानुभूती पूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन महाप्रबंधक मित्तल यांनी दिल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजय कुमार मित्तल हे मनमाड रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी आ. सुहास कांदे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आ. कांदे यांनी नांदगाव रेल्वे स्थानकावर मुंबई वाराणसी काशी एक्स्प्रेस, मुंबई वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, पुणे-अमृतसर झेलम एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस मुंबई-भुसावळ, मुंबई-नाशिक पैसेंजर आदी 9 गाड्यांना थांबा होता.

मात्र आता त्यातून 5 गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला तर दोन्ही पैसेंजर ह्या करोनामुळे गेल्या 9 महिन्या पासून बंद आहे. आता फक्त दोन गाड्या सुरु असून त्यापैकी महाराष्ट्र एक्स्प्रेस ही नाशिक, मुंबईकडे जात नाही. उरली फक्त सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी मुंबईला जाण्यासाठी सकाळी येते तर भुसावळकडे जाण्यासाठी रात्री येते.

शिवाय मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्यामुळे मनमाड भागातून तर पैसेंजर बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे बंद करण्यात आलेल्या सर्व गाड्या सुरु करण्यात याव्या आणि ज्या गाड्यांचा नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबा रद्द करण्यात आला तो पूर्ववत करावा अशी जोरदार मागणी केली.

यावेळी महाप्रबंधक मित्तल यांना निवेदन ही देण्यात आले मागण्य मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजामाऊ नावड, शहर प्रमुख मयूर बोरसे, मुन्नाभाऊ दरगुडे, सचिन दरगुडे, योगेश इमले, रवि खैरनार, अजिक्य शाली, प्रवारी संटनेथे नरेंद्र खैरे, संदीप व्यवहारे, टॅक्सी आणि रिक्षा युनियनचे बाळा मोसले वितास मोरे, रामा फेजवज, कैलास पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com