नांदगावचे ग्रामदैवत 'एकविरा देवी'

नांदगावचे ग्रामदैवत 'एकविरा देवी'

नांदगाव। संजय मोरे Nandgaon

नांदगावचे ग्रामदैवत (Nandgaon Village deity) असलेल्या एकवीरा देवीचे मंदिर (Ekvira Devi Temple) शाकंभरी नदीच्या किनाऱ्यावर (Shaambari River) वसलेले आहे. मंदिरासमोरच तीस फुट उंचीची दगडी दीपमाळ आणि त्याखाली असलेलं श्रीगणेशाचं एक छोटस मंदिर आहे. दर्शनाला जाण्यापूर्वी गणरायाचं दर्शन होतं आणि त्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश होतो. बाजूलाच रेणुका माता आणि श्री गणेशाची मूर्ती आहे या मंदिराला दोन घुमट आहे....

दुसऱ्या गाभाऱ्यात एकवीरा देवीची स्वयंभू मूर्ती आहे. दगडाची मूर्ती पूर्वी शेंदूरचर्चित होती जिचा नंतर जिर्णोद्धार झाला. एक वीरा देवी ट्रस्टच्या पंचांनी लासुरचे कारागीर भावसार यांच्याकडून देवीची सध्या मंदिरात असलेली मूर्ती घडवून घेतली आहे. अकरा फूट उंच असलेली ही मूर्ती सप्तशृंगी निवासिनी देवी प्रमाणेच आहे. देवीला अठराभुजा असून तिच्या प्रत्येक हातात विविध प्रकारचे शस्त्र आहेत. मंदिराच्या भोवती विस्तीर्ण पटांगण असून जवळच शितला देवीचे मंदिर (Shitala Devi Temple) आहे.

या मंदिराच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की, सतराव्या शतकात ब्रम्हानंद महाराज (Brahmanand Maharaj) यांना देवीचा दृष्टांत झाला आणि पेशवे यांच्या मदतीने त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. संपुर्णपणे आखीव रेखीव दगडांमध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून आजही मंदिर भक्कम स्थितीत उभे आहे.

पूर्वी या मंदिरामध्ये देवीची सहा फुटांची मूर्ती होती परंतु पंचक्रोशीत देवीची महती पसरली तशी भाविकांची गर्दी वाढू लागली हे पाहून पुढे हिंदू पंच कमिटीने अकरा फूट उंचीची आणि अठरा भुजा असलेली देवीची प्रतिष्ठापना करण्यात केली. देवीच्या अठरा हातांमध्ये १८ शस्त्र आहेत. वाघावर स्वार झालेली एकविरा देवी शुंभ आणि अशुंभ राक्षसांचा वध करत असल्याचे रूप पाहायला मिळते. देवीच्या हातामध्ये विविध आयुधे पाहायला मिळतात.

चैत्र उत्सवाच्या काळात आणि शारदीय नवरात्रोत्सवात (Shardiy Navratrotsav 2021) येथे यात्रा भरते. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस महिला भाविक मंदिरात घटी बसवतात. नवरात्र मध्ये नऊ दिवस देवीला नऊ पैठण्या घातल्या जातात. रोजचे रोज शृंगार केला जातो. मातेचे रूप रोजच्या रोज बदलत असते. देवीचे रोज तीनही रूपा मध्ये दर्शन होते.

देवीच्या पूजाअर्चा करण्याचा मान गुरव यांच्या कडे असून स्वर्गीय अंबादास गुरव यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रसाद गुरव देवीची पूजाअर्चा करतात. अमरावती, धुळे कार्ला ह्या देवीच्या ठिकाणांबरोबरच नांदगाव येथे एकवीरा देवी चे पूर्ण रूप पहावयास मिळते. एकविरा माते वर भाविकांची अपार श्रद्धा असून देवीच्या दर्शनाने अनेक मनोकामना पूर्ण झाल्याचे भाविक सांगतात.

हिंदू पंचकमिटी ट्रस्टच्या वतीने या मंदिराची देखभाल केली जाते. नवरात्रोत्सवात काळात देवीला सोने-चांदीचे आभूषणे चढविले जातात देवीला चांदीचे दोन मुकुट असून नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेच्या उत्सव काळात पालखीतून देवीचा सांदळा व मुकूट यांची गावातून मिरवणूक काढली जाते. चैत्र उत्सवात कुस्त्या, शामीगोंडा, रहाड तसेच सामाजिक सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबवले जातात.

हिंदू पंच कमिटी (Hindu Panch comity) व छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळ (Shivaji Maharaj Janseva mandal) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आयोजित केला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रहाड बरोबरच बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि मुखवटे (सोंगं) वाचवण्याचा कार्यक्रम मंदिर परिसरात साजरा केला जातो.

मंदिरात नवरात्रोत्सव काळात पहाटे चार वाजता दुपारी बारा वाजता व संध्याकाळी आठ वाजता तीन वेळा आरती व महापूजा केली जाते. नवरात्रोत्सव काळात महिला भाविकांची संख्या लक्षणीय पहावयास मिळते. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com