नांदगाव वार्तापत्र: आरक्षण सोडत; इच्छूक धास्तावले

नांदगाव वार्तापत्र: आरक्षण सोडत; इच्छूक धास्तावले

नांदगाव । संजय मोरे | Nandgaon

नांदगाव नगर परिषद (Nandgaon Municipal Council) निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर प्रभाग रचना (Ward formation) पाठोपाठ प्रभागाचे आरक्षण (Ward reservation) नुकतेच जाहीर करण्यात आल्याने विविध राजकीय पक्षाच्या (Political party) इच्छुकांतर्फे उमेदवारी निश्चितीसाठी मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला आहे.

महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित झाल्याने गत एक-दोन वर्षापासून निवडणूक (election) लढविण्याच्या दृष्टीकोनातून तयारीत असलेल्यां अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. अशातच आरक्षण (Reservation) सोडतीनंतर निर्माण झालेली प्रभाग रचना देखील काहींची अडचण वाढविणारी ठरली आहे. प्रभागाच्या सद्यस्थितीनुसार पक्षीय उमेदवाराविरूध्दच अनेक इच्छुक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अपक्षांची मांदियाळी राहणार असल्याचे चित्र दिसत असून हा पेच सोडवतांंना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची कसोटी पणाला लागणार आहे.

सोमवार (दि. 13) रोजी नांदगाव नगर परिषदेसाठी (Nandgaon Municipal Council) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत अनेकांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरले गेले असले तरी आपण नसलो तरी घरातील महिलेलाच संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार बोलून दाखविला जात आहे.

पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा आत्मविश्वास जवळपास सर्वच इच्छुकांतर्फे व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उमेदवाराला स्वपक्षातील इच्छुकांशीच मोठा सामना करावा लागणार आहे. सर्वांनाच निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे पक्षीय कार्यकर्त्यासाठी बलिदान देणार कोण? ही रंगलेली चर्चा निवडणूक चुरसपुर्ण राहणार असल्याचे संकेत देणारी ठरत होती.

प्रभागाची नव्याने झालेली रचना तसेच जाहिर झालेली आरक्षण (Reservation) सोडत राजकीय नेत्यांसह इच्छुकांचे समीकरण विस्कळीत करणारी ठरली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोयीच्या प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी वाढण्यास प्रारंभ झाला आहे. नगरपरिषदेत आरक्षणानुसार 10 जागांवर महिलाराज राहणार असले महिला राखीव जागेसाठी आपल्याच घरातील महिलेला संधी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत.

इच्छुकांची संख्या लक्षात घेता एकमेकांचे उमेदवारीचे पतंग काटण्याचे प्रकार प्रत्येक पक्षात घडणार आहेत किंबहुना त्यास सुरूवातही झाली असल्याचे बोलले जाते. इच्छुकांच्या लक्षणीय संख्येमुळेच पक्षांतराचे प्रकारही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच मुद्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्याचीही शक्यता अधिक राहील, असे वाटते. काहींंना आरक्षण सोडत सोयीची तर काहींना गैरसोयीची झाली आहे. त्यामुळे अडचण झालेल्या इच्छुकांव्दारे सोयीच्या प्रभागाचा शोध घेतला जात असून अगोदरच सोयीच्या प्रभागांंसाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत असलेल्या इच्छुकांच्या संख्येत वाढ होत आहे.

नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत (election) प्रमुख राजकीय पक्षांसह इतर लहान पक्ष, संघटना, आघाड्यांचाही बोलबाला राहणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. सभागृहात राजकीय पक्षासह अपक्ष-आघाडीच्या सदस्यांचा देखील शिरकाव होण्याची शक्यता आत्तापासूनच वर्तवली जात असल्याने सत्ता स्थापनेच्या वेळेस इतर घटकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

नगरपरिषदेत पुन्हा आमचीच सत्ता राहील, असा ठाम आत्मविश्वास शिवसेनेतर्फे व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढते की स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे गठन केले जाते हे आजमितीस सागणे कठीण दिसत आहे. राज्यात शिवसेनेसोबत (shiv sena) घरोबा करून सत्तेत सहभागी झालेली काँग्रेस (congress), राष्ट्रवादीही (NCP) नगर परिषदेच्या (nagar parishad) निवडणुकीसाठी जोरात आहे. कारण शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांमध्ये देखील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आघाडी झाल्यास अनेक इच्छूक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंडखोरी होण्याचीच शक्यता अधिक राहणार आहे.

भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party), मनसे (MNS), आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party), रिपाई (RPI), वंचित बहुजन संघटना यासह अनेक छोटे-मोठे पक्ष-संघटनाही तयारीत आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारलेले बाहुबली इच्छूक अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे मतांचे विभाजन अटळ असल्याने विजयाचा मार्ग यंदा खडतर राहणार असल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेत शिवसेनेला रोखण्यासाठी वेळेवर शहर महाविकास आघाड़ी होऊ शकते. नांदगाव शहर विकास आघाडीही जन्म घेऊ शकते व यासह इतरही काही प्रयोग होऊ शकतो कां, अशा खमंग चर्चा शहरात रंगल्या असून राजकीय नेते देखील घडत असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे बोलले जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com