नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या 88 सरपंच पदासाठी स्त्री आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांचे अध्यक्षतेखाली तर तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. त्यात तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले आहेत. नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर होताच सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

नुकताच तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण झाला असून या ग्रामपंचायती सह तालुक्यातील एकूण 88 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि. 28 जानेवारी घेण्यात आली होती.

नांदगाव तालुक्यातील अनुसूचित जाती महिला सरपंच साठी वंजारवाडी, तळवाडे, वडाळी बु" तर अनुसूचित जमाती स्त्री सरपंच आरक्षण मोहेंगाव, हिगणेदेहरे, वाखारी, पानेवाडी, अंनकवाडे, न्यायडोंगरी, पाझनदेव तर ना मा प्रवर्ग स्त्री राखीवसाठी फुलेंनगर, लोहशिंगवे, सोयगाव, भालूर, न्यू पांझन,परधाडी, लक्ष्मीनगर, सटाणे, मळगाव, पळाशी, रोहिले बुद्रुक, टाकळी बुद्रुक ही आदी १२ ग्रामपंचतीचा समावेश असून सर्वसाधारण सरपंच स्त्री राखीव साठी हिगणवाडी, क्रांतीनगर, धोटाणे बुद्रुक, जामदरी, पिंपरखेड, गिरणानगर, माणिकपुंज, अमोदे, बोराळे, कसाबखेडा, मल्हारवाडी, लोढरे, जळगाव खुर्द, खिर्डी, भैरी, कोंढार, गोंडेगाव, मोरझर, एकवई, हिरेनगर, धनेर, जवळकी, बिरोळे या २३ ग्रामपंचायती सरपंच पदासाठी स्त्री राखीव करण्यात आल्या आहेत.

महिलां सरपंच पदाचे १/२ आरक्षण निश्चित करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम १९६४ मधील नियम ४ चे अवलोकन करून सन २०२० ते २०२५ साठी महिला आरक्षण निश्चित करण्यात आले असून हे आरक्षण दिनांक १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायती साठी स्त्री सरपंच पदासाठी लागू राहणार आहेत. यावेळी नायब तहसीलदार योगेश जमदाडे, मरकर,संतोष डुबरे आदी अधिकारी उपस्थित होते.