नांदगाव : तीन दिवसापासून बंद पडलेला वीज पुरवठा अखेर सुरु
नाशिक

नांदगाव : तीन दिवसापासून बंद पडलेला वीज पुरवठा अखेर सुरु

Gokul Pawar

नांदगाव : गेल्या तीन दिवसापासून बंद पडलेला वीज पुरवठा आज अखेर सुरु करण्यात यश आल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. तर गेल्या तीन दिवसांपासून रात्रंदिवस धावपळ करीत असलेल्या वीज कर्मचारी, अधिकारी यांनीही सूटकेचा निःश्वास सोडला.

जिल्हा परिषदेच्या सदस्या आर्की.अश्विनी अनिल आहेर,व मनमाड येथील कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी , नांदगावचे सहाय्यक अभीयंता वाटपाडे यांनी विशेष प्रयत्न करून पिपरखेड येथून वीज पुरवठा सुरु करून दिला. यापूर्वी न्यायडोंगरी वीज उपकेंद्रास चाळीसगाव (जि. जळगाव) येथून वीज पुरवठा केला जात असे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडतं परंतु जळगाव जिल्हा विभाग येत असल्यामुळे नाशिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तिकडे जाऊन काम करू शकत नव्हते.

हिच खरी तांत्रिक अडचण हेरून आर्की.अश्विनी आहेर यांनी हा प्रश्न जि.प सर्वसाधारण सभेत उपस्थित करून अध्यक्षा शितल सांगळे यांच्या लक्षात आणून देत हा सीमावाद कायम स्वरुपी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यास कार्यकारी अभियंता डोंगरे व सहायक अभियंता वाटपाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक बाबींची पूर्तता लागलीच करून दिल्याने अश्विनी आहेर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

नाशिक विभागातील पिपरखेड(ता. नांदगाव) येथून न्यायडोंगरी उप केंद्रासाठी वीज पुरवठा सुरु झाल्याने कायमचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळे न्यायडोंगरी, बिरोळा, हिंगणेदेहरे, पिंप्रीहवेली, परधाडी, पिंपरखेड, चिंचविहिर, चांदोरा, जळगाव खु, या गावांना याचा फायदा होणार आहे. या कामाचे सर्वांनीच समाधान व्यक्त करीत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे आभार केले.

Deshdoot
www.deshdoot.com