Video : चौघांच्या शौर्याला सलाम! लेंडी नदीच्या पाण्यातून वाचवला एकाचा जीव

Video : चौघांच्या शौर्याला सलाम! लेंडी नदीच्या पाण्यातून वाचवला एकाचा जीव

नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव तालुक्याला दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचे झोडपले. (Heavy rain in Nandgaon) पावसामुळे सर्वत्र तारांबळ उडालेली असतानाच लेंडी नदीच्या (Lendi River) पुरात एकजण वाहून जात असताना त्यास वाचविण्यात येथील नागरिकांना यश आले....

अधिक माहिती अशी की, अरुण रामनाथ साळवे नामक व्यक्ती मार्केट यार्डपरिसरात (Nandgaon Market Yard area) नदीच्या पाण्यात पडला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाचवा वाचवा म्हणून विनावण्या करत होता. दरम्यान, गांधीनगर परिसरातील काही युवकांनी हातांची साखळी करत या नागरिकाला वाहत्या नदीच्या पात्रातून बाहेर काढले.

अंकुश संजय थोरात, विक्की राजु शिंदे, सागर दिनकर वाकळे व योगेश दिनकर वाकळे यांनी या युवकास जीवाची पर्वा न करता वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल (Video viral in Social Media) झाला आहे. गांधीनगर (Gandhinagar) परिसरातील या युवकांच्या कार्याचा गौरव सोशल मीडियात होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com